July 1, 2025 2:03 am

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार गरीबांच्या कल्याणासाठी झटणारे – हर्षवर्धन पाटील…

अपनी भाषा में पढ़े! Translate

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार गरीबांच्या कल्याणासाठी झटणारे – हर्षवर्धन पाटील…

पेट्रोल व डिझेलवरील शुल्क कपातीने प्रत्येक नागरिकाला दिलासा..

इंदापूर प्रतिनिधी – आदित्य बोराटे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेल वरील उत्पादन शुल्कात यापूर्वी नोव्हेंबर 2021 मध्ये कपात केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा उत्पादन शुल्कात कपात केल्याने पेट्रोल व डिझेल स्वस्त झाल्याने त्याचा फायदा देशातील प्रत्येक नागरिकास व शेतकऱ्यांना होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार हे गरीबांच्या कल्याणासाठी झटणारे कार्यक्षम सरकार आहे, असे गौरवोद्गार भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काढले.

जगामध्ये क्रूड तेलाच्या किमती वाढत असल्याने आपल्या देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढत आहेत. मात्र केंद्र सरकार हे गरिबांचे कल्याणासाठी समर्पित असल्याने केंद्र सरकारने आतापर्यंत पेट्रोल-डिझेल वरील उत्पादन शुल्क तीन वेळा टप्प्याटप्प्याने कमी केले आहे. पेट्रोल प्रतिलिटर 9 रुपये 50 पैसे व डिझेल प्रति लिटर 7 रुपये, उज्वला गॅस प्रति सिलेंडर 200 रुपये याप्रमाणे स्वस्त झाल्याने देशातील नागरिकांना मोठा दिलासा देण्याचे काम केंद्र सरकारने केलेले आहे.

कोरोना काळापासून गेली 2 वर्षे झाली, केंद्र सरकारकडून पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत देशातील नागरिकांना गहू, तांदूळ अन्नधान्य मोफत दिले जात आहे. या मोफत अन्नधान्य योजनेचे जगामध्ये कौतुक होत आहे. तर दुसऱ्या बाजूला राज्यातील महाविकास आघाडी सरकार पेट्रोल-डिझेल वरील उत्पादन शुल्क काही प्रमाणात कमी करण्यास तयार नाही, परिणामी देशात सर्वात महाग पेट्रोल-डिझेल हे महाराष्ट्रातील नागरिकांना घ्यावे लागत आहे. राज्य सरकारने पेट्रोल,डिझेल वरील शुल्कात कपात करून महाराष्ट्रातील नागरिकांना दिलासा द्यावा, असे आवाहनही हर्षवर्धन पाटील यांनी केले. केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेल उत्पादन शुल्कात कपात करून नागरिकांना दिलासा दिलेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे हर्षवर्धन पाटील यांनी आभार व्यक्त केले.

   

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!