रिधोरे गावामध्ये “मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराला” उदंड प्रतिसाद….
दि. 16, प्रतिनिधी – दत्तात्रेय पतुले
रविवार दिनांक 15/05/20022 रोजी रिधोरे गावामध्ये, साधु वासवानी मिशन संचलित, इनलॅक्स आणि बुधराणी हॉस्पिटल, पुणे व भारतीय जनता पार्टी, रिधोरे यांच्या संयुक्त विद्यमाने, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्त, एकदिवसीय “मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबाराचे आयोजन, सर्वेश क्लीनिक, रिधोरे येथे करण्यात आले होते. या शिबिरामध्ये एकूण 250 लोकांची तपासणी करण्यात आली.या शिबिरासाठी तांदुळवाडी, पापनस व नालगाव येथील लोक उपस्थित होते. त्यातील 38 लाभार्थीना मोफत ऑपरेशन साठी निवड करण्यात आली.त्यांची बुधराणी हॉस्पिटल, पुणे येथे येण्या जाण्याची व ऑपरेशनची मोफत सोई हॉस्पिटल कडुन करण्यात येणार आहे.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे श्री. योगेश पाटील ( सरचिटणीस, भाजपा माढा तालुका), श्री. शरद खांडेकर, श्री बालाजी नाईकवाडे(उंदरगावचे माजी सरपंच), श्री.पिंटू दादा सलगर, श्री.गणेश मुटकुळे, श्री. लखन पवार, श्री.रणवीर सलगर, श्री.विश्वराज पाटील श्री.बळीराम गायकवाड ( जिल्हा कार्याध्यक्ष, रयत क्रांती संघटना), श्री.सत्यवान गायकवाड ( तालुकाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना), श्री. दत्तात्रय गायकवाड ( तालुकाध्यक्ष, रयत क्रांती संघटना) श्री.अमोल गायकवाड ( तालुकाध्यक्ष, भारतीय किसान संघ), डॉ. सोमनाथ गायकवाड (सर्वेश क्लिनिक), बुधराणी हॉस्पिटल चे प्रतिनिधी श्री. परमेश्वर गोडगे, श्री.राहुल जाधव आदी उपस्थित होते.
कार्यक्रमास उपस्थित पाहुण्यांचे आभार श्री.श्रीधर (आण्णा) शिंदे (मा.तालुकाध्यक्ष,भाजपा) यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री.महेश गायकवाड, श्री.अविनाश शिंदे, श्री.मयुर आदमाने श्री.रोहीत थोरात व श्री.रामदास पाटील यांनी परिश्रम घेतले.