सौ.रेखा भरत येशी यांना ‘अमळनेर युवा परिटधोबी मंडळाच्या’ वतीने ” समाज भूषण पुरस्कार” प्रदान
अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर येथील सौ रेखा भरत ईशी ह्याअमळनेर पोलीस स्टेशन ला महिला पोलीस म्हणुन काम करत असतांना ‘दामिनी पथकाच्या’ माध्यमातून गैरकृत्य करणाऱ्या जोडप्यांना पकडणे, प्रेमीयुगुलांना पकडून मुलींना आई-वडिलांच्या स्वाधीन करून पालकांना सावध करणे यातून जवळ जवळ 40 कुटुंबांना उद्धवस्त होण्यापासून वाचविले .
त्यांच्या ह्या कार्याची दखल घेत ‘लोकमतने’ आपणास ‘ शौर्य पुरस्कार ‘ प्रदान केला. त्यांच्या ह्या कार्याचा युवा परीट धोबी मंडळ व समाजास सार्थ अभिमान आहे. त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन अंमळनेर युवा परीट मंडळाच्यावतीने सौ.रेखा भरत येशी यांना समाज भूषण पुरस्कार संत सखाराम महाराज गादीपती ह.भ.प. संत प्रसाद महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
मा.कार्यसमाट आमदार शिरिष दादा चौधरी यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रीय उपाध्यक्ष परिटधोबी समाज आण्णासाहेब एकनाथराव बोरसे गुरुजी हे होते तर.श्री सुरेश ठाकरे, श्री अरुण धोबी,श्री सर्जेराव बेडीस्कर, श्री ईश्वर मोरे,श्री वासुशेठ सोनवणे, श्री धनंजय सोनवणे, श्री राकेश वाघ, श्री दिपक बाविस्कर, श्री प्रविण पाठक, श्री सुरज परदेशी,श्री सुनिल भोई युवापरिटधोबी मंडळाचे अध्यक्ष श्री रवींद्र जाधव उपाध्यक्ष श्री उमेश वाल्हे उपाध्यक्ष श्री अविनाश जाधव तालुकाध्यक्ष श्री गंगाराम वाल्हे लाँन्डी संघटना अध्यक्ष मधुकर निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते , तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री विनोद जाधव सर व सुत्रसंचालन श्री दिपक वाल्हे यांनी केले .
कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री विजय वाघ सर ( सचिव ) श्री अनिल जाधव ( सहसचिव ) श्री मोतीलाल जाधव ( खजिनदार ) कार्यकारी सदस्य श्री गणेश नेरकर श्री अनिल वाघ श्री मनोज निकुंभ श्री गिरीश चित्ते श्री भरत जाधव तसेच सल्लागार श्री सतिश पवार श्री किशोर महाले श्री भरत येशी श्री अनिल मांडोळे श्री नितिन जाधव परिश्रम घेतले
त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल डेबुजी झिंगराजी जाणोरकर ग्रंथालय.अमळनेर युवापरिटधोबी मंडळ अमळनेर अमळनेर शहरातील लाँन्डी धारक बांधवां धोबीसमाजाच्या सर्व पदाधिकारी व नातेवाईक मित्रपरिवाराकडुन त्यांचे अभिनंदन होत आहे.