भोगसम्राट युवराज भदाणे
३०-३५ वर्षापुर्वी “भोगसम्राट” नावाचे नाटक आले होते.त्या नाटकातील भोगसम्राट आत्ता मला युवराज भदाणेत आढळून आला आहे. आपल्याला मिळालेल्या पद,सत्ता व अधिकाराचा गैरवापर करून आपली लैंगिक भूक शमविण्यासाठी त्यांचा वापर करणारा युवराज धोंडू भदाणे हा भोगसम्राट आहे. त्याने आजवर किती अबलांचे लैगिक शोषण केले हे गुलदस्त्यात असले तरी दोन प्रकरणांची लोक चर्चा करतात.आणि धूर निघतो म्हणजे तिथे आग असतेच हा सृष्टीचा नियम आहे.
मी ऐकिव बाबींवर विश्वास ठेवत नाही परंतू रेकार्ड वरील बाबींवर ठणकाऊन बोलतो. गेल्या २६ फेब्रुवारी २०२२ रोजी एपीएमसी पोलीस ठाण्यात दाखल झालेली तक्रार त्याचा “भोगसम्राटपणा” सिद्ध करणारा आहे. तो जनसंपर्क अधिकारी असल्याने एक २९ वर्षीय गरजू महिला नोकरीची चौकशी करण्यासाठी भदाणे पर्यंत पोहचते आणि हा भोगसम्राट आपल्या जाळ्यात तिला अडकवण्याचा कट रचतो. नोव्हेंबर महिन्याच्या ५ तारखेस तो सदर गरजू महिलेस आपले ओळखपत्र घेऊन बोलवतो व चोपडा कोर्ट येथील रस्त्यावरून तिला आपल्या कारने तुर्भे येथील SP Lodge येथे नेतो.अडला हरी गाढवाचे पाय धरी या वृत्तीने सदर महिला ५.३० वाजता लाॅजमधे जाते. तिथे तो तिला नोकरी देण्याच्या बदल्यात मला खुश कर म्हणत बळजबरीने संभोग करतो.ती नाही नाही म्हणत असताना हा लांडगा तिच्यावर तुटून पडतो आणि तिच्या अब्रूचे लचके तोडतो. आणि शहाजोगपणे जबरदस्तीने तिच्या हातात एक हजार रूपये कोंबतो. एका अबलेच्या अब्रूची किंमत एक हजार आखणारा हा नालायक काय लायकिचा असेल ? ती महिला स्वेच्छेने आली असे त्याला भासवायचे असेल. तो तिला कार मधुन घेऊन गेला कारण नोकरीच्या गरजेपायी त्याची व तिची ओळख झाली.इथेच त्याने आपल्या पदाचा व अधिकाराचा गैरवापर केला, हे सिद्ध होते. नोकरीसाठी आयडी प्रूफ म्हणून मागवलेले ओळखपत्र त्याने लाॅजवर दिले.यातच या भोगसम्राटाचा कावेबाजपणा सिद्ध होतो. आपल्या पदाचा असा गैरवापर होऊ लागला तर महापालिका वा शासकिय कार्यालयं काॅल काॅल सेंटर वा कुंटणखाने व्हायला वेळ लागणार नाही. आपल्या मर्जीतील एका वैद्यकिय क्षेत्रातील महिलेस परमनंट करण्याचा एक अधिकारी प्रयत्न करीत आहे. गेल्या आठवड्यात महापालिकेत एका अधिका-यास भेटण्यास गेलो असता भर दुपारी तो अधिकारी एका गर्लफ्रेंडशी लगट करताना दिसला.आपल्या खुर्चीवर स्टाईलमधे तिला बसवून फोटोसेशन करीत होता. बंद केबिन मधील बंदसीसी कॅमेरे हे खुल्लमखुल्या रोमांसला वाव मिळवून देतात व त्यातूनच “भोगसम्राट” भदाणे तयार होतात.
भदाणेने सदर महिलेस लाॅजमधे नेल्याचा कधीच इन्कार केलेला नाही.रजिस्टरमधे ५ नोव्हेंबर रोजी ५.३० ला आगमन व ९.३० ते १० वा.ला निर्गमनाची नोंद आहे. तसेच या भोगसम्राटाने खास आपली असली खाज भागवण्याच्या हेतूने आपले बोगस आधार कार्ड देखील तेथे आयडी प्रूफ म्हणून सादर केले होते त्याची प्रत देखील उपलब्ध असून ते बोगस आहे ! हे मी ठणकाऊन सांगू शकतो. त्याबाबत यथावकाश कायदेशीर कारवाई करायला मी भाग पाडणारच आहे.
मुंबई उच्च न्यायालातून अटक पूर्व जामीन मिळवला म्हणजे आपण जिंकलो या अविर्भावात व भ्रमात या भोगसम्राटाने राहू नये.माझ्या न्यायालयातून तो निर्दोष सुटू शकणार नाही. नियतीच्या न्यायालयात लाच घेतली जात नाही, ती योग्य वेळी योग्य न्याय निवाडा करेलच.तो पर्यंत लढण्याची माझी तयारी आहे.
आपल्या पदाचा व अधिकाराचा गैरवापर करून एखाद्या गरजू महिलेचे लैंगिक शोषण करणा-या लिंगपिसाट भोगसम्राट भदाणेचे हे कृत्य नैतिक अध:पतन या सदरात मोडत असल्यामुळें त्याला त्वरित बडतर्फ केले पाहिजे.
या भोगसम्राटला हद्दपार केले पाहिजे व ही जबाबदारी आयुक्तांचीच आहे.
दिलीप मालवणकर
ज्येष्ठ पत्रकार
9822902470