June 30, 2025 4:21 am

आम्हाला पण निरोगी आयुष्य जगू द्या

अपनी भाषा में पढ़े! Translate

आम्हाला पण निरोगी आयुष्य जगू द्या

आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील महसुली वॉर्ड क्रमांक 3 मधील सांडपाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस वाढतच आहे. नागरिकांना स्वताच्या अंगणात बसणे देखील जिकरीचे झाले आहे. गाव ओढ्यात गावचे गटाराचे सांडपाणी व दूध डेअरी फार्म मधील दूषित सांडपाणी सोडले जात आहे, त्यामुळे साथीचे रोग फैलावणाऱ्या जीवघेण्या डासांचे प्रमाण भयंकर वाढले आहे. त्याचप्रमाणे खाजगी नळ पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी ओढ्याच्या बाजूला असलेमुळे विहिरीला पाणी असून देखील गेली कित्येक वर्षे पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. त्याचप्रमाणे ऐतिहासिक मुधारा डोंगर परिसरात पूर्व दिशेस शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय असून निवासी वसतिगृहे व गावचे मूळ रहिवाशी देखील वास्तव्य करत आहेत. मुधारा डोंगराच्या पाश्चिम दिशेला गोवर्धन दुध प्रकल्पाचे दूषित सांडपाणी बेकायदेशीररित्या सोडले जात आहे, याबाबत गेली 23 वर्ष लढा देऊन देखील परिस्थिती जैसे थे आहे. सत्ता व सत्तेचा दुरुपयोग करून हे प्रकरण दडपले जात आहे. या दूषित सांडपाण्यामुळे साथीचे रोग फैलावणाऱ्या डासांचा प्रादुर्भाव वाढला असून दुर्गंधी पसरली आहे. याच ठिकाणी घाण कचरा पेटवत असल्याने धुरामुळे सर्व डास पूर्वेकडील नागरी वस्त्यांमध्ये घोंगावत आहे. मंचर व परिसरातील वयोवृद्ध नागरिक पहाटे 4 वाजेपासून रात्री उशिरा पर्यंत शतपावली व शुद्ध हवा घेण्यासाठी ईश्वर बाबा मंदिरापर्यंत येत असतात, काही काळ ईश्वर बाबा मंदिर येथे विसावा घेत असताना डास व दुर्गंधी असल्याने जास्त काळ थांबू शकत नाही. यावर आजपर्यंत कोणीही दखल घेतली नाही. याबाबत जो आवाज उठवेल त्याच्यावर दबाव व दहशत निर्माण केली जाते, यावर तात्काळ सबंधित अधिकार्‍यांनी दखल घेऊन उपाययोजना आखावी व नागरिकांचे सार्वजनिक आरोग्य धोक्यात येण्यापासून वाचावावे हि विनंती.


हि पोष्ट कोणाचाही द्वेष व राजकारण नजरेसमोर ठेवून टाकण्याचा माझा हेतू नाही, परंतु हे म्हणजे अति झाले असून यावर कायमस्वरूपी निर्णय व्हावा हिच तळमळ.
श्री. बबनराव भोर.
सरचिटणीस नाथशक्ति संघटना महाराष्ट्र प्रदेश.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!