जागतिक भारत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत हर्षदा गरुड हिला सुवर्णपदक
पुणे/ निलेश गायकवाड
ग्रीसमध्ये सुरू असलेल्या कनिष्ठ गटाच्या जागतिक भारत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत, पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळच्या हर्षदा गरुड हिनं सुवर्णपदक पटकावलं.
३ मॅच प्रकारामध्ये ७० किलो तर क्लीन अँड जर्कमध्ये ८३ किलो वजन उचलत सर्वोत्तम कामगिरी साधली.
४५ किलो वजनी गटात सुवर्ण पदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे.
यापूर्वी ताश्कंदमध्ये २०१९ मध्ये पार पडलेल्या आशियाई स्पर्धेत तिला कास्य पदकावर समाधान मानावं लागलं होतं.