June 30, 2025 2:00 pm

नॉनस्टॉप प्रांताधिकारी गजानन गुरव यांची वर्षपूर्तीकडे वाटचाल

अपनी भाषा में पढ़े! Translate

नॉनस्टॉप प्रांताधिकारी गजानन गुरव यांची वर्षपूर्तीकडे वाटचाल

कामाचा उरक असणारे अधिकारी असल्यानेच त्यांच्याकडे जोखमीचे अनेक पदभार

पंढरपूर प्रतिनिधी गणेश ननवरे

कोरोना काळ जसजसा कमी होत गेला, तसतसा पंढरपूरचे प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्याकडे कार्यभार वाढतच गेला. महसूल विभागातील चार ठिकाणचा पदभार संभाळून एकही तक्रार न येऊ देता, त्यांनी एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करण्याकडे वाटचाल केली आहे. येत्या ऑगस्ट मध्ये पंढरपूरचे प्रांताधिकारी म्हणून एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत आहे.

पंढरपूरचे प्रांताधिकारी गजानन गुरव हे काही वर्षापूर्वी पंढरपूरचे तहसीलदार म्हणून कार्यरत होते. या काळात त्यांच्या कामाचा आवाका पंढरपूर तालुक्यातील नागरिकांनी पहिला होता. कोणत्याही महसुली कामात इतर कोणाचीही लुडबुड त्यांना अजिबात खपली नाही. प्रत्येकाचे काम सरळ मार्गाने निपटणे, यावर त्यांचा भर राहिला . हीच कामाची हातोटी त्यांना साथ देत राहिली. पंढरपूर होऊन जाताच त्यांना प्रमोशन मिळत गेले. सोलापूर जिल्ह्याचे भूसंपादन अधिकारी म्हणूनही त्यांनी काम केले. गतवर्षी सचिन ढोले यांची बदली झाल्याने पंढरपूरच्या प्रांताधिकारीपदी त्यांची नियुक्ती झाली.

पंढरपूरचे प्रांताधिकारी म्हणून निवड होताच त्यांनी प्रत्येक कामास हळूहळू गती देण्याचे काम केले. राष्ट्रीय महामार्गात संपादित झालेल्या प्रकरणांचा निपटारा करण्याचे काम सुरू केले. त्यांच्या वाटणीला वादातीत प्रकरणांचा निपटारा आला. तडजोडीच्या मार्गाने न मिटणारी प्रकरणे त्यांनी न्यायालयात पाठवली. अजूनही काही प्रकरणांचा न्यायनिवाडा सुरूच आहे.

पंढरपूर नगरपरिषदेची मुदत संपल्याने नगरपरिषदेवर प्रशासक म्हणून त्यांची निवड करण्यात आली. याच वेळी श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे कर्यकरी अधिकारी विठ्ठल जोशी यांची अचानक बदली झाली, आणि मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकारी पदाचा भारही त्यांच्यावर पडला.

पंढरपूर नगरपरिषद , श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरचे प्रांताधिकारी एवढ्या पदांचा पदभार त्यांच्यावर पडला. काम करत राहणे हा स्थायीभाव त्यांच्या अंगी असल्याने, त्यांच्या कार्यक्षमतेवर कोणताही परिणाम झाला नाही. आज तागायत मंदिर समिती, पंढरपूर नगरपरिषद तसेच पंढरपूरचे प्रांताधिकारी ही पदे सांभाळत असताना, कोणत्याही सामान्य जनाने त्यांच्या विरोधात तक्रार केली नाही. कोणत्याही प्रकरणावर तोंडातून शब्द न काढता त्यावर मार्ग काढण्याचे काम त्यांना अचूक जमते .यामुळेच तीन ते चार पदांचा कार्यभार त्यांच्यावर असूनही , विनातक्रार एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करण्याकडे त्यांची वाटचाल सुरू आहे.

यावर्षी कोरोणाचे निर्बंध उठले आणि प्रांत कार्यालय नागरिकांना खुले झाले. यामुळे कोरोना काळात प्रलंबित राहिलेल्या प्रकरणांची सुनावणी सुरू आहे. सात ऑक्टोबर पासून मंदिर दर्शनासाठी खुले झाले. त्यानंतर कार्तिक वारी सर्व विभागातील अधिकाऱ्यांची संपर्क साधून व्यवस्थित पार पाडली. मंदिर समितीचा सर्वकष विकास आराखडा तयार करून कामाचे नियोजन केले. निवडणूक प्रक्रिया कोणतेही गालबोट न लावता व्यवस्थितपणे पार पाडली. आता आषाढी वारीचे नियोजन बदलत्या परिस्थितीत नेटकेपणाने चालू आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!