नाशिकच्या महाराणा प्रताप जयंती अध्यक्ष पदी प्रसिध्द सामाजिक कार्यकर्ते आणि पोलिस टुडे वर्तमान पत्राचे मुख्य संपादक श्री रत्नदिप सिसोदिया यांची निवड
|| जय महाराणा ||
सन्माननीय महाराणा प्रेमी समाज बांधव,
सालाबादाप्रमाणे येत्या २ जून 2022 रोजी महाराणा प्रताप सिंह यांची तीथीप्रमाणे ४८२ वी जयंती आपण सर्व विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांनी साजरी करणार आहोत.
दिनांक 30 एप्रिल 2022 रोजी हॉटेल सुरेश प्लाझा, नाशिक येथे महाराणा प्रताप जयंती उत्सव समिती आणि नाशिक शहरातील सर्व महाराणा प्रेमी मंडळांची सभा घेण्यात आली.
रोटेशन प्रमाणे या वर्षी अध्यक्षपदाचा मान महाराणा प्रताप बहुउद्देशिय मंडळाकडे आला आहे.
मंडळातर्फे आपले सभासद श्री.रत्नदीप सिसोदिया यांचे नाव सुचविण्यात आले.
या सभेत नाशिकच्या महाराणा प्रताप जयंती अध्यक्ष पदी प्रसिध्द सामाजिक कार्यकर्ते आणि पोलिस टुडे वर्तमान पत्राचे मुख्य संपादक श्री रत्नदिप सिसोदिया यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
श्री रत्नदीप सिसोदिया यांनी या आधी देखील खान्देशातील शिरपूर, कळमसरे, आमोदे, दोंडाईचा येथील महाराणा प्रताप जयंतीचे अध्यक्षपद आणि विविध महत्त्वाची पदे भूषविली आहेत. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश इत्यादी राज्यांमधील राजपूत समाजातील मान्यवरांसमवेत नियमित संपर्क साधून त्यांनी राष्ट्रीय स्तरावर देखील समाजाचे प्रतिनिधित्व केले आहे.
सर्व समाज बांधव तसेच धुळे जळगाव नाशिक शहरातील सामाजिक मंडळे आणि सर्व मान्यवरांतर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.