बावडा गावात नवरा आणि बायकोची सात जन्माची बांधली गाठ एकाच दिवशी तुटली….
बायकोचं पहाटे चार वाजता निधन तर नवऱ्याचं संध्याकाळी सहा वाजता.
प्रतिनिधी: समाधान रजपूत
इंदापूर तालुक्यातील बावडा या गावचे रहिवासी असणारे हनुमंत कांबळे व त्यांची पत्नी हवई कांबळे या दोघांचे एकाच दिवशी निधन झाले पती आणि पत्नीचे एका दिवशी निधन होणे हे एक अलौकिक, आश्चर्यकारक घटना मानली जात आहे. सात जन्माच्या गाठी मानलेल्या एकाच दिवशी तुटल्या त्यामुळे बावडा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
तुकाराम महाराज आपल्या अभंगात ओवी म्हणतात की, पतीच्या मता अनुसरूणी पतिव्रता, तुका म्हणे धन्य पतिव्रता, तिची देवावरी सत्ता पतीच्या आधी पत्नीने सुवांसिन जाणे हे एक भाग्याचं लक्षण समजलं जाते
पत्नी सदैव म्हणतं असती की कपाळाचं कुंकू माझ्या जन्मास जाऊ दे आयुष्याचा जोडीदार सुखरूप राहू दे
हवई हनुमंत कांबळे वय ७७ वर्षे यांचे (दि.३०) एप्रिल रोजी पहाटे ४ वाजता दु:खद निधन झाले तर संध्याकाळी ६ वाजता हनुमंत यशवंत कांबळे यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी रमाईनगर(बावडा,ता.इंदापूर) येथील राहात्या घरी दु:खद निधन झाले बायको आणि नवरा यांचे एकाच दिवशी दु:खद निधन झाल्याने संपूर्ण बावडे गावातील ग्रामस्थांच्या वतीने हळहळ व्यक्त करण्यात आली हवई कांबळे व हनुमंत कांबळे यांच्या पाठीमागे ३ मुली २ मुले नातवंडे असा मोठा परिवार आहे हनुमंत कांबळे हे वारकरी संप्रदायात होते वारकरी संप्रदाय मानणारा हा परिवार तर पत्रकार गणेश कांबळे यांचे ते आजी आणि आजोबा होते