July 1, 2025 7:47 am

भाजप युवा मोर्चा इंदापूर तालुका कोअर कमिटी प्रमुखपदी राजवर्धन पाटील..

अपनी भाषा में पढ़े! Translate

भाजप युवा मोर्चा इंदापूर तालुका कोअर कमिटी प्रमुखपदी राजवर्धन पाटील..

इंदापूर प्रतिनिधी – आदित्य बोराटे

इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टीने शनिवार दिनांक (30 एप्रिल) रोजी तालुका पदाधिकारी व भारतीय जनता पार्टी मोर्चा व आघाडी जाहीर केली आहे. इंदापूर येथे आयोजित कार्यक्रमा प्रसंगी माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पदाधिकारी यांची नावे जाहीर करण्यात आली. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा इंदापूर तालुका कोअर कमिटी प्रमुखपदी राजवर्धन हर्षवर्धन पाटील यांची निवड या प्रसंगी जाहीर करण्यात आली.

राजवर्धन पाटील हे राजकारणात सक्रिय असून तालुक्यात होत असलेल्या विविध कार्यक्रमांना, नागरिकांच्या सुख दुःखात, सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत.

राजवर्धन पाटील यांची भाजपा युवा मोर्चाच्या इंदापूर तालुका कोअर कमिटी प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल युवकांमध्ये आनंदी वातावरण आहे. सामाजिक व राजकीय क्षेत्राबरोबरच आता राजवर्धन पाटील भारतीय जनता पार्टीच्या संघटनेमध्ये देखील सक्रिय झाले आहेत. येणाऱ्या काळात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजवर्धन पाटील भाजपच्या युवा मोर्चा संघटनेमध्ये युवकांच्या प्रश्नासाठी मैदानात उतरणार आहेत.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!