शहरी भागातील विद्यार्थ्यांनसारखे शिक्षण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळावे-संजय खाडे
(निलेश गायकवाड )
भिगवण ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र दिनानिमित्त विरवाडी माध्यमिक विद्यालयात ध्वजारोहनाचा कार्यक्रम पार पडला यावेळी रोटरीचे अध्यक्ष संजय खाडे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले यावेळी बोलताना संजय खाडे म्हणाले सुत्तत्ती इंटरप्राईजेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सीएसआर फंडातून व रोटरी क्लब ऑफ पूना फार ईस्ट व रोटरी क्लब भिगवण यांच्या माध्यमातुन विद्यालयाला एल ई डी संच भेट देण्यात आला आहे. अशाच प्रकारे परिसरातील शाळांमध्ये २५ स्मार्ट टीव्ही प्रोजेक्ट सॉफ्टवेअर सह बसवण्यात येणार आहेत शहरी भागातील विद्यार्थ्यांन सारखे शिक्षण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळावे या उद्देशाने रोटरी क्लब काम करत आहे येणाऱ्या काळामध्ये शिक्षणावरती रोटरी क्लब चांगलाच भर देणार आहे.
१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी स्वतंत्र महाराष्ट्राचा कलश यशवंतराव चव्हाण यांच्याकडे सोपावला आणि महाराष्ट्र राज्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला यापुर्वी १०५ जणांच्या बलिदानाने राज्याची निर्मीती झाली आणि या ६३ वर्षांच्या कालावधित महाराष्ट्राने परंपरा जपण्यासह कला क्रिडा शिक्षण समाजकारण औध्योगिकिकरण अशा विविध पातळीवर देशाचे नेतृत्व केले आहे देशातील ३७ टक्के करांचा हिस्सा महाराष्ट्राचा आहे यामुळे महाराष्ट्र नेहमीच देशाच्या प्रगतीत मोठा हातभार लावत असल्याने सह्याद्री हिमालयाच्या पाठीशी असल्याचे यावेळी बोलताना सचिन बोगावत म्हणाले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर होते तर आदर्श सरपंच तुकाराम बंडगर पत्रकार संघाचे संस्थापक दादासाहेब थोरात विद्यालयाचे अध्यक्ष नानासाहेब बंडगर सचिव अनिल तांबे रोटरीचे संस्थापक अध्यक्ष सचिन बोगावत, माजी अध्यक्ष संपत बंडगर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक सौ. एस के ढवाण यांनी केले तर सुत्रसंचालन मुख्याध्यापक मनोहर बंडगर यांनी केले. यावेळी कु.दडस सी एस उपशिक्षक
श्री परदेशी ए .टी.उपशिक्षक श्री कर्पे एम व्ही उपशिक्षक
श्री कुंभार ए.के. लेखनिक ढमे पी .एल.परिचर, कुंभार एस पी शिपाई हे उपस्थित होते.