विद्या प्रतिष्ठान बिल्ट, भिगवण येथे ‘वसुंधरा दिन’ उत्साहात साजरा
(निलेश गायकवाड )
विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मिडियम स्कूल बिल्ट, भिगवण येथे ‘जागतिक वसुंधरा दिन’ साजरा करण्यात आला. यानिमित्ताने शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी ‘पक्ष्यांसाठी चारा’ या संकल्पनेअंतर्गत पक्ष्यांसाठी घरटी तयार करून शालेय परिसरातील झाडांवर अडकवण्यात आली. शाळेमध्ये वसुंधरा रक्षणाची प्रतिज्ञा आणि ‘माझी वसुंधरा माझी जबाबदारी’ या विषयावर फॅन्सी ड्रेस स्पर्धा (इ.३ री ते ५ वी) व वक्तृत्व स्पर्धा (इ.६ वी ते ८ वी) घेण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. तसेच प्री-प्रायमरीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘वसुंधरा वाचवा’ या विषयावर फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक वृंद व कर्मचारी वर्ग यांच्या सहकार्याने संपन्न झाला.
