भाजपा युवा मोर्चाच्या इंदापूर तालुका अध्यक्षपदी तेजस देवकाते यांची निवड ; चळवळीतील कार्यकर्त्याला मिळाला न्याय
(निलेश गायकवाड )
इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टीने शनिवार दिनांक 30 एप्रिल रोजी तालुका पदाधिकारी व भारतीय जनता पार्टी मोर्चा व आघाडी जाहीर केली आहे. इंदापूर येथे आयोजित कार्यक्रमा प्रसंगी माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पदाधिकारी यांची नावे जाहीर करण्यात आली. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा इंदापूर तालुका अध्यक्षपदी श्री. तेजस एकनाथ देवकाते यांची निवड या प्रसंगी जाहीर करण्यात आली.

याप्रसंगी महाराष्ट्र किसान मोर्चाचे अध्यक्ष वासुदेव काळे, पुणे जिल्ह्यात भाजपचे अध्यक्ष गणेश भेगडे, जालिंदर कामठे, अविनाश मोटे, तालुकाध्यक्ष अँड, शरद जामदार, शहराध्यक्ष शकील सय्यद व तालुक्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तेजस देवकाते हे स्वर्गीय लोकनेते माजी जिल्हा परिषद सदस्य विलास बंडगर यांच्या सहवासात तयार झालेले युवक नेतृत्व आहे . दौंड चे आमदार राहुल कुल,तसेच जिल्ह्यात असणारे भारतीय जनता पार्टीचे विशेष पदाधिकारी व नेते मंडळी व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे विश्वासू व कट्टर समर्थक म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात परिचित आहेत. बारामती लोकसभा मतदार संघात भाजप चे लोकसभा युवक अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेले आहे .
एका सर्वसामान्य कुटुंबातील युवकाला भाजप सारख्या राष्ट्रीय पक्षाने तालुका पातळीवर काम करण्याची संधी दिल्यामुळे सर्व युवका मध्ये आनंदाचे वातावरण आहे .
यापूर्वी श्री देवकाते यांनी भाजप जिल्हा पातळीवर विविध जबाबदाऱ्या व्यवस्थित पणे सांभाळल्या आहेत.तसेच मदनवाडी ग्रामपंचायत वर विद्यमान सदस्य व माजी उपसरपंच म्हणून काम पहिले आहे.एक परखड वक्ता म्हणून व मेहनती कार्यकर्ता म्हणून सुद्धा श्री देवकाते याना ओळखतात. एका दिवसरात्र मेहनत करणाऱ्या कार्यकर्त्याला आज संधी मिळाली आहे .
या निवडीनंतर संपूर्ण तालुक्यातील युवकांचे संघटन वाढवण्याचे व पक्ष मजबूत बळकटीसाठी काम प्रधान्याने करणार असल्याचे देवकाते यांनी बोलताना सांगितले.