July 1, 2025 7:07 am

30 एप्रिल रोजी अरण येथे होणार माळी समाज भव्य मेळावा:– सयाजी बनसोडे

अपनी भाषा में पढ़े! Translate

30 एप्रिल रोजी अरण येथे होणार माळी समाज भव्य मेळावा:– सयाजी बनसोडे

पंढरपूर प्रतिनिधी गणेश ननवरे

‘समाजकार्यासाठी समाज संघटन’ हे ब्रीदवाक्य घेऊन स्थापन करण्यात आलेल्या सावता परिषद यांच्या वतीने श्री संत शिरोमणी सावता माळी महाराज यांची जन्म कर्मभूमी श्री.क्षेत्र अरणच्या विकासासाठी व राज्यातील सकल माळी समाज सावता परिषदेच्या माध्यमातून संघटित व्हावा यासाठी माळी समाजाचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती सावता परिषदेचे युवक सोलापूर जिल्हा अध्यक्ष सयाजी बनसोडे यांनी दिली.
अरण (ता.माढा) येथे माळी समाजाच्या मेळाव्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. विशेष अतिथी म्हणून अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री धनंजय मुंडे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्ता भरणे महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
याशिवाय खा.अमोल कोल्हे,माजी मंत्री अतुल सावे आ.जयकुमार गोरे, आ.मनीषा चौधरी, आ.देवयानी फरांदे आ.प्रज्ञा सातव,आ.बबनदादा शिंदे,आ.सतीश चव्हाण, आमदार संदीप शिरसागर,आ.यशवंत माने,आ.प्रणिती शिंदे आ.संजय शिंदे,आ.शहाजी पाटील,मा.आ.अमरसिंह पंडित, माळी शुगरचे मॅनेजिंग डायरेक्टर रंजन गिरमे, धाराशिव शिवसेना संपर्कप्रमुख शंकरराव बोरकर,कर्जत नगरपालिकेचे प्रथम माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत, शिवसेना सोलापूर जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, मा.जि.प. सदस्य बाळासाहेब माळी, जिल्हा दूध संघाचे व्हा.चेअरमन दिपक माळी,मा.शंकरराव वाघमारे, मा.मधुकर बनसोडे, दत्तात्रेय घाडगे. आदीसह विविध पक्षाचे पदाधिकारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
शनिवार तीस एप्रिल दुपारी साडेबारा वाजता माळी समाजाचा भव्य मेळावा श्रीक्षेत्र अरण येथे मोठ्या दिमाखात होणार आहे यासाठी सकल माळी समाज बांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सावता परिषदेचे युवक सोलापूर जिल्हाध्यक्ष सयाजी बनसोडे यांनी केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!