रमजान ईद व शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दौंड पोलिसांकडून शहरांमध्ये पथसंचलन
प्रतिनिधी – विकी ओहोळ
दौंड – दौंड शहरात साजरा करण्यात येणारा अक्षय तृतीया, शिवजयंती उत्सव व तीन तारखेला साजरा होणारा रमजान ईद त्याअनुषंगाने शहरांमध्ये दोन्ही सण अतिशय आनंदात ,शांततेने, बंधुभावाने व सलोख्याने साजरे व्हावे यामध्ये कुठेही कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता दौंड शहरामध्ये हुतात्मा चौक, आंबेडकर चौक,गांधी चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गावर दौंड पोलिसांकडून पथसंचलन करण्यात आले यावेळी दौंड चे उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस साहेब दौंड चे पोलीस निरीक्षक विनोद घुगे साहेब यांच्यासह 6 पोलीस अधिकारी व 73 पोलिस जवान हजर होते.