July 1, 2025 1:20 am

अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेला सराईत गुन्हेगार जेरबंद,

अपनी भाषा में पढ़े! Translate

अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेला सराईत गुन्हेगार जेरबंद,
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
प्रतिनिधी.संदिप कायगुडे
दिनांक : – २८/०४/२०२२ अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेला सराईत गुन्हेगार जेरबंद , स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना चेक करुन सदरचे हद्दपार गुन्हेगार हद्दपार आदेशाचा भंग करुन अहमदनगर जिल्ह्यामध्ये बेकायदेशिररित्या वास्तव्य करताना मिळून आल्यास कारवाई करणेबाबत मा . पोलीस अधीक्षक सो , अहमदनगर यांनी पोनि / श्री . अनिल कटके , स्थानिक गुन्हे शाखा , अहमदनगर यांना आदेश दिले होते . त्या आदेशाप्रमाणे पोनि / अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि / सोमनाथ दिवटे , पोहेकॉ / देवेंद्र शेलार , पोना / शंकर चौधरी , पोकॉ / रोहित येमुल , सागर ससाणे व मयुर गायकवाड यांचे अधिपत्याखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार यांचे स्वतंत्र पथक नेमून हद्दपार इसमांना चेक करुन कारवाई करणे बाबत आदेश दिले होते . त्याप्रमाणे पथकातील अधिकारी व अंमलदार हे राहुरी तालुक्यातील हद्दपार गुन्हेगारांना चेक करीत असताना पोनि / श्री . अनिल कटके यांना गोपनिय माहिती मिळाली कि , हद्दपार इसम नामे १ ) मनोज डोंगरे हा हद्दपार असताना लपुनछपून राहुरी खुर्द येथे आहे . अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकातील अंमलदार यांनी नमुद हद्दपार इसमांचा शोध घेतला असता हद्दपार इसम नामे १ ) मनोज गोरक्षनाथ डोंगरे हा राहुरी खुर्द येथे मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतले . नमुद हद्दपार गुन्हेगारांचे हद्दपार आदेशाबाबत खात्री केली असता , हद्दपार प्राधिकर तथा , पोलीस अधिक्षक , अहमदनगर यांचेकडील आदेश क्रमांक स्थागुशा / हडपार – राहुरी पोस्टे / ५५ / ४८५ / २०२१ , दिनांक १६ / ०२ / २०२ ९ पासुन १८ महिने कालावधीसाठी अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेले आहे . आरोपी नामे मनोज गोरक्षनाथ डांगरे रा . रा . राहुरी फॅक्टरी , ता . राहुरी याने हद्दपार आदेशाचा भंग करुन बेकायदेशिररित्या राहुरी खुर्द भागामध्ये वास्तव्य करीत असताना मिळून आल्याने त्यांचे विरुध्द राहुरी पोलीस स्टेशन गु.र.नं. ३४८/२०२२ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे . पुढील कार्यवाही राहुरी पोलीस स्टेशन करीत आहे . सदरची कारवाई मा . श्री . मनोज पाटील साहेब , पोलीस अधीक्षक , अहमदनगर , मा . श्रीमती . स्वाती भोर मॅडम , अपर पोलीस अधीक्षक , अहमदनगर व श्री . संदीप मिटके साहेब , उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे .

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!