सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला बीडमध्ये केराची टोपली.
बीडचे मतदार असलेले मुख्याधिकारीच बनले निवडणूक अधिकारी
प्रतिनिधी: श्री.दादासाहेब नन्नवरे
बीड नगरपरिषदचे मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे हे बीड नगरपरिषदेचे मतदार आहेत. मतदार असलेला व्यक्तीच बीड शहराचा मुख्याधिकारी असून पर्यायाने निवडणूक अधिकारी आहे..
आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे व इतर पदाधिकाऱ्यांनी शासकीय विश्रामगृह बीड येथे पत्रकार परिषदेत पुराव्यासह हा प्रकार समोर आणत मुख्याधिकारी यांची बदली करावी, जेणेकरून येणाऱ्या निवडणुका ह्या पारदर्शक होतील अशी मागणी केली आहे. आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अंगावर मागण्यांचा पोशाख परिधान करूनच या बाबीचा निषेध केला.. या पत्रकार परिषदेस जिल्हाध्यक्ष अशोक येडे, जिल्हा सचिव रामधन जमाले, उपाध्यक्ष अक्रम शेख, शहराध्यक्ष सय्यद सादेक, मिलिंद पाळणे, भीमराव कुटे, आझम खान, बलभीम भगत, नवनाथ जाधव, अमोल सावंत आदींची उपस्थिती होती…