June 30, 2025 11:15 am

जिल्हा परिषद शाळा धावडे येथे शाळा पूर्व तयारीचा पहिला मेळावा संपन्न

अपनी भाषा में पढ़े! Translate

जिल्हा परिषद शाळा धावडे येथे शाळा पूर्व तयारीचा पहिला मेळावा संपन्न
आज दि १९/०४/२०२२ मंगळवार रोजी इ,१लीत दाखल होणाऱ्या दाखलपात्र मुलांचा शासन निर्णयानुसार शाळा पूर्व तयारी मेळावा आयोजित करण्यात आला,कोरोना काळात , लहान मुलांनाही बंदिस्त करून टाकले, त्यांना प्रत्यक्ष अंगणवाडी व बालवाडीचा अनुभव घेता आला नाही, त्यांची शाळा पूर्व तयारी होणे फार आवश्यक आहे, वाचन लेखन शिकतांना कोणतेही अडथळे होणार नाहीत, व्यवस्थित शिकू शकतील,यासाठी शाळेत शाळा पूर्व तयारीचा पहिला मेळावा आयोजित करण्यात आला,
मेळाव्याचे उद्घाटन सुभाष भिल, (अध्यक्ष शा,व्य,समिती), योगेश देवरे,संजय पाटील, विजय मराठे, कृष्णा भिल, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले,मुलांचे नाव नोंदणी, शारीरिक क्षमता, बौद्धिक क्षमता, भाषा विकास, सामाजिक व भावनात्मक विकास, गणनपूर्व विकास, साहित्य वाटप व मार्गदर्शन या स्टॉल नुसार दाखल पात्र मुलांची शाळा पूर्व क्षमता तपासणी करण्यात आली,व लेखन साहित्य वाटप आले.
मुख्याध्यापक कैलास ईशी, उपशिक्षक शालिग्राम काकुर्डे, प्रविण टाकणे,कमल जगताप, मनिषा गिरासे, अंगणवाडी सेविका, अनिता गिरासे, वंदना पाटील, अरस्तोल गिरासे, मनिषा पाटील, शानू भिल, आशा सेविका, सोनाली कुवर,धनश्री गिरासे, स्वयंसेविका सविता गिरासे, दीपिका गिरासे,मंगल भिल यांनी सहकार्य केले,मेळाव्यात २२ मुलांची शाळा पूर्व तयारी क्षमता तपासणी करण्यात आली,स्वयंसेविका दिपीका गिरासे, सविता गिरासे,यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले,कार्यक्रमाचे प्रास्ताविक कैलास ईशी व सुत्र संचालन प्रविण टाकणे यांनी केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!