June 30, 2025 6:30 am

भिगवण पोलीस स्टेशन येथे बुधवारी तक्रार निवारण दिनाचे आयोजन

अपनी भाषा में पढ़े! Translate

भिगवण पोलीस स्टेशन येथे बुधवारी तक्रार निवारण दिनाचे आयोजन

(निलेश गायकवाड)

भिगवण पोलीस स्टेशनमध्ये तक्रारींचे निवारण करताना तक्रारदारांनीही समक्ष उपस्थित राहावे असे आवाहन भिगवण पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक दिलीप पवार यांनी केले आहे. तक्रारदारांच्या तक्रारीचे निवारण करण्याबाबत जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन यांना पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख व अप्पर पोलीस अधीक्षक सो.बारामती गणेश इंगळे यांच्या आदेशानुसार व मार्गदनाखाली तक्रार निवारण दिनाच्या आयोजन करण्यात आले . यानुसार भिगवण पोलीस स्टेशन येथेही तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले असून, पोलीस स्टेशनला प्राप्त झालेल्या तक्रारीसंबंधित अर्जदार, गैरअर्जदार यांना समक्ष बोलावून त्यांच्या तक्रार अर्जातील तक्रारींवर त्वरित निर्णय घेऊन पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

संबंधित तक्रारदारांनी बुधवारी सकाळी दहा वाजता उपस्थित राहावे. तसेच भिगवण पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी, बीट अमलदार व कर्मचारी यावेळी उपस्थित राहणार असून, तक्रारदारांच्या तक्रारींचे जागच्या जागी निराकरण केले जाणार आहे.

जास्तीत जास्त तक्रारदारांनी बुधवारी उपस्थित राहून आपल्या तक्रारींचा ताबडतोब निपटारा करून घ्यावा, असे आवाहन भिगवण पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी केले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!