शिरपूर: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे, युवा सेना प्रमुख पर्यावरण मंत्री माननीय आदित्य साहेब ठाकरे, शिवसेना नेते खासदार संजय राऊत जी साहेब. उत्तर महाराष्ट्र समन्वयक रविंद्रजी मिर्लेकर साहेब. यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र वाहतूक सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष उदय जी दळवी साहेब, महाराष्ट्र वाहतूक सेनेचे सरचिटणीस सूर्यकांत जी तांदळकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत.

धुळे व नंदुरबार जिल्ह्याचे संपर्कप्रमुख बबनराव जी थोरात साहेब,धुळे जिल्हा सहसंपर्कप्रमुख हिलाल अण्णा माळी, धुळे जिल्हा प्रमुख हेमंत जी साळुंखे साहेब, तालुकाप्रमुख दीपक चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे जिल्हा ग्रामीण महाराष्ट्र वाहतुक सेना जिल्हाप्रमुख पदी जितेंद्र सुनील पाटील यांची तर हेमंत पाठक शिरपूर शहर प्रमुख म्हणून व विजय दत्तात्रय मराठे यांची उपशहर प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.