June 30, 2025 4:41 pm

इंदापूर शहरामध्ये घरकुले बांधण्यासाठी आवश्यक असणाऱ्या जागेचा प्रश्न निकाली- राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

अपनी भाषा में पढ़े! Translate

इंदापूर शहरामध्ये घरकुले बांधण्यासाठी आवश्यक असणाऱ्या जागेचा प्रश्न निकाली

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

इंदापूर प्रतिनिधी – आदित्य बोराटे

इंदापूर शहरातील पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत तब्बल 588 घरकुले नुकतीच मंजूर झालेले आहेत.परंतु जागे अभावी ही घरकुले बांधण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली होती. मात्र राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख व इंदापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाची एकत्रित बैठक घेत हा प्रश्न निकाली लावला असून या बैठकीमध्ये गट नंबर१५७/३ मधील एकूण ०१ क्षेत्र पैकी ०.९० आर इतके क्षेत्र पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेली घरकुले बांधण्यासाठीसाठी हस्तांतरित करण्यात आले आहे.

 सदरील जागा हस्तांतरणाचे पत्र राज्यमंत्री भरणे व जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांचे हस्ते इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील, नगरपालिकेचे मुख्याधिकारी कापरे व शहर स्तरीय तांत्रिक कक्ष अभियंता प्रसाद देशमुख यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. या जागेवर तब्बल 588 घरकुले बांधण्यात येणार असून यामुळे इंदापूर शहरातील आर्थिक दुर्बल घटक व बेघर नागरिकांना खूप मोठा लाभ होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात इंदापूर शहरातील सामान्य नागरिकांना स्वतःचे हक्काचे घर उपलब्ध होणार असून या सर्व लाभार्थ्यांनी राज्यमंत्री भरणे यांनी ताबडतोब जागेचा प्रश्न मार्गी लावल्याने समाधान व्यक्त केले. 

   यावेळी इंदापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब ढवळे, नगरसेवक अनिकेत वाघ,अतुल शेटे पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष इमरान शेख आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!