भडणे येथे आरोग्यवर्धनी दिवस निमित्ताने गावकऱ्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन
प्रतिनिधी आप्पासाहेब कोळी
शिंदखेडा तालुक्यातील भडने येथे आयुष्यमान भारत आरोग्य वर्धनी दिवस निमित्ताने गावकऱ्यांचे आरोग्य तपासणी व आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले टी.बी , क्षयरोग व इतर आजारांना बाहेर जाण्यास पेक्षा आपल्या गावातच वरिष्ठ डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यांच्यावरती औषध उपचार आता आपण भडने गावातच करू शकतो याविषयी डॉ. राहुल तडवी व आरोग्य सेविका कविता बोरसे यांनी गावकऱ्यांच्या समवेत त्यांची तपासणी शुगर बी.पी चेक करून घेतली तसेच विखरण येथील वरिष्ठ डॉक्टर कुरेशी यांच्याशी ऑनलाईन संपर्क करून रुग्णांना मार्गदर्शन केले मोठ्या व दूर्जर आजारांना आता बाहेर जाण्याची गरज नाही आपल्या गावातच आपण त्यांचा योग्य ते उपचार घेऊ शकतो. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी सरपंच अशोक पाटील , विक्रम पाटील, पोलीस पाटील युवराज माळी, आरोग्य सेविका कविता बोरसे, राहुल तडवी ,उषाबाई शिंदे ,पुष्पाबाई पाटील कल्पना पाटील ,नानू मंगळे, नागो पाटील, सुदाम पाटील रामचंद्र पाटील रामदास मंगळे ,आप्पासाहेब कोळी, रूपाबाई मंगळे ग्रामस्थ कार्यक्रमास उपस्थित होते.