प्रामाणिकपणा ….धुलाई व इस्त्रीसाठी आलेल्या कपड्यातील सापडलेले सोन्याचे दागिने ग्राहकाला केले परत
पुसेगाव येथील विठ्ठल नगर मधील सुरज ड्रायक्लीन चे मालक श्री चंद्रकांत शेडगे यांचा कपडे धुलाई व इस्त्री चा व्यवसाय असून गेली 60 वर्षापासून त्यांचा पुर्ववत व्यवसाय आहे, दिनांक 14 एप्रिल रोजी त्यांच्याकडे उंबरमळे गावातील शेतकरी श्री अमोल लावंड यांनी कपडे धुलाई व इस्त्रीसाठी दिले असता घाईगडबडीत त्यांच्या घरच्यांच्या कडून कपड्यां मध्ये लावंड यांचे एक तोळाचे साठ हजार रूपये किमतीचे सोन्याचे दागिने श्री शेडगे यांना सापडले असता या जागेवर जर दुसरे कोणी असते मनामध्ये अनेक प्रश्न, उपस्थित राहिले असते,सोने पाहताक्षणीच शेडगे यांनी अमोल लावंड याना फोनद्वारे संपर्क करून त्यांना तातडीने बोलावून घेऊन त्यांचे सोन्याचे दागिने त्यांना परत केले व त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळाला , व त्यांनी चंद्रकांत शेडगे यांचे लावंड यांनी आभार मानले, व्यवसायामधील आर्थिक मंदी असताना देखील व्यवसाय मेटाकुटीला आले आसताना सुद्धा चंद्रकांत शेडगे यांनी त्यांना सापडलेले सोने प्रामाणिक परत केले शेडगे यांना अशा बऱ्याच घटनेमध्ये वेळोवेळी पैसे अथवा सोने कपड्यांमधे सापडल्यास त्यानी ते प्रामाणिकपणे परत केलेलें आहेत,तसेच ग्रामपंचायत उपसरपंच पृथ्वीराज जाधव ,बाळासाहेब जाधव ,सतोंष साळुखे,प्रताप जाधव,क्षिरसागर सर ,धनाजी जाधव ,शकंर शेठ जाधव, सुनिलशेठ जाधव,विकास आबा, ऋषिकेश पवार,केशव जाधव यांनी चंद्रकांत शेडगे यांचे प्रामाणिक पणाचे कौतुक केले.