लडाखमधले शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
निलेश गायकवाड
लडाखमधले शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने येत्या मंगळवारी पुण्यात टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रांगणात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांनी ही माहिती दिली. विद्यार्थ्यांमधील सृजनशीलतेला प्रोत्साहन देऊन कर्तृत्ववान युवा पिढीची केलेली घडण, लोकमान्यांच्या चतुःसूत्रीतील स्वदेशीचा हिरीरिने पुरस्कार तसंच प्रसार, त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रातील गुणात्मक बदलासाठी वांगचुक यांची या पुरस्कारासाठी ही निवड करण्यात आल्याचं, पुरस्कार समितीकडून सांगण्यात आलं आहे.