करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) :- क्रांतीसुर्य प्रतिष्ठान करमाळा यांच्या वतीने दि. ११/०४/२०२२ रोजी क्रांतीसुर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती वेगवेगळ्या उपक्रमाने होणार साजरी होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली.
1) सकाळी 9:00 वाजता फुलेंच्या स्मारकास पुष्पहार अर्पण.
2) 10:00 वाजता भव्य रक्तदान शिबिर.
3) दुपारी 1:00 वाजता वक्तृत्व स्पर्धा
क्रांतीसुर्य प्रतिष्ठान करमाळा यांच्या वतीने कधीही मोफत रक्त मिळवून देण्यात येणार आहे. यावेळी प्रतिष्ठानच्यावतीने महात्मा ज्योतिराव फुले स्मारका भोवती सफेद लायटिंगचे चंबु लावण्यात आले आहेत तसेच स्मारकाच्या उजव्या बाजूला अप्रतिम देखणं असं महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीमाई फुले यांचे स्केच काढण्यात आले आहे. 11 एप्रिल या दिवशी स्मारक वेगवेगळ्या फुलांनी सजवलं जाणार आहे. विविध उपक्रमाने व सजावटीने यावर्षीची जयंती अप्रतिम होणार असल्याचे प्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात आले.
सदर जयंती साजरी करण्यासाठी श्री. अमोल नाळे, श्री. प्रशांत शिंदे, श्री. मयुर यादव, श्री. विशाल बनकर श्री. नवनाथ मोहोळकर सर, श्री. विक्रम राऊत, श्री. दिपक जाधव, सर व श्री. हनुमंत जाधव सर अथक परिश्रम घेत आहेत.