July 1, 2025 7:34 am

आमदार रोहित पवारांच्या पाठपुराव्याने जामखेडमधील सुसज्ज नवीन न्यायालयीन इमारतीचे बांधकाम पूर्ण!

अपनी भाषा में पढ़े! Translate

आमदार रोहित पवारांच्या पाठपुराव्याने जामखेडमधील सुसज्ज नवीन न्यायालयीन इमारतीचे बांधकाम पूर्ण!
प्रतिनिधी.संदिप कायगुडे

जामखेड | जामखेड शहराच्या सौंदर्यात भर घालणारी सुसज्ज व अत्याधुनिक सुविधायुक्त इमारतीचे काम नुकतेच पुर्ण झालेले असुन या इमारतीचा उद्घाटन सोहळा शनिवार, 9 एप्रिल रोजी आरोळे वस्ती, जामखेड येथे होणार आहे. संबंधित कामासाठी मंजूर झालेली रक्कम ही अपुरी पडत असल्यामुळे अत्याधुनिक व सर्व सुविधायुक्त न्यायालयीन इमारतीचे काम मागील दोन वर्षापुर्वी अपुर्ण अवस्थेत होते.

न्यायालयीन इमारतीमध्ये गरजेनुसार लागणारे रस्ते, इमारतीची संरक्षक भिंत, अतिरिक्त लोक अदालत, इमारत परिसरात बागबगीचा व सुसज्ज सुविधांयुक्त फर्निचर इत्यादी बाबी या मंजुर झालेल्या प्रशासकिय मान्यतेच्या रक्कमेत पुर्ण होणार नाहीत, ही बाब आमदार रोहितदादा पवार यांच्या लक्षात आली. तसेच इमारतीच्या संथ गतीने सुरु असलेल्या कामास चालना मिळण्यासाठी आमदार रोहितदादा पवार यांनी शासन दरबारी पाठपुरावा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तातडीने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अर्थ विभाग,न्याय विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्व मंत्रालयीन अधिकारी यांची एकत्रीत व्यय अग्रक्रम समितीची बैठक उपमुख्यमंत्री कार्यालय दालनात मंत्रालय येथे आयोजीत करुन सदर काम हे पुर्णत्वाकडे जाण्यासाठी आवश्यक असणारी 3.40 कोटी इतक्या वाढीव रक्कमेस मान्यता देण्यात आली.

सदर बैठकीच्या अनुषंगाने या कामाच्या सुधारीत प्रशासकीय मान्यतेच्या 10 कोटी 21 लाख एवढ्या रक्कमेस शासनाकडुन मान्यता प्राप्त झाल्यामुळे सुसज्ज व सर्व सुविधायुक्त अशा नवीन न्यायालयीन इमारतीचे काम पुर्ण झालेले असुन ही इमारत जामखेडकरांसाठी सुरू होणार आहे. शनिवारी या इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होणार असल्याने एक दिवस पूर्वी शुक्रवारी आमदार रोहित पवार यांनी या इमारतीच्या कामाची पाहणी केली. तसेच याबाबत यापूर्वी त्यांनी PWD विभाग व कंत्राटदार यांच्याबरोबर वेळोवेळी पाठपुरावा केला होता. मतदारसंघातील कोणतेही काम प्रलंबित राहिले नाही पाहिजे यासाठी आमदार रोहितदादा सतत प्रयत्नशील असतात. यावेळी पाहणी करत असताना आमदार रोहित दादा पवार यांच्यासोबत अहमदनगरचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा साहेब, जगताप साहेब व इतरही अधिकारी कर्मचारी आणि स्थानिक वकील बांधव उपस्थित होते.

आमदार रोहितदादा पवार यांच्या प्रयत्नामुळे न्यायालयाच्या नवीन इमारतीचे रखडलेले बांधकाम पूर्ण झाले आहे. त्यासाठी लागणारा संपूर्ण पाठपुरावा आमदार रोहितदादा यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केला होता व लागणारा अतिरिक्त निधी देखील रोहितदादांनी शासनाकडून उपलब्ध करून दिला त्याबद्दल समस्त वकील बांधवांतर्फे मी त्यांचे आभार व्यक्त करतो. – अॅड. हर्षल डोके, मा. अध्यक्ष वकील संघ, जामखेड

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!