उन्हाळ्याची तीव्रता आणि भाविकांची गर्दी पाहून निरा नरसिंहपुर येथे नरसिंहराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे पाणपोईचे उद्घाटन.
प्रतिनिधी : समाधान रजपूत
नीरा नरसिंगपूर तालुका इंदापूर येथे उन्हाची तीव्रता तसेच येणारे भाविक आणि काठी साठी किंवा कावडी साठी शिखर शिंगणापूरला जाणारे भाविक यांना चांगले, स्वच्छ आणि थंड पाणी पिण्यासाठी मिळावे म्हणून नरसिंह राज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेमार्फत आज पानपोई चालू करण्यात आली. पानपोईचे उद्घाटन आनंद काकडे यांच्या हस्ते करण्यात आले.
गावामध्ये येणाऱ्या भाविकांना तसेच शिखर शिंगणापूर यात्रेसाठी जाणार्या भाविकांना मोफत थंड आणि स्वच्छ पाणी मिळावे म्हणून संस्थेचे अध्यक्ष व भ्रष्टाचार निर्मूलन चे इंदापूर तालुका अध्यक्ष गौतम सरवदे आणि नीरा नरसिंगपूर गावचे सरपंच प्रतिनिधी डॉ. सिध्दार्थ सरवदे व उपाध्यक्ष चंद्रकांत सरवदे तसेच सदस्य खुशाल जाधव आणि मित्रमंडळी यांच्या प्रयत्नातून ही पाणपोई चालू करण्यात आली.यावेळी नीरा नरसिंगपूर गावचे वस्ताद सचिन कदम, माजी सरपंच आण्णासाहेब काळे, सुप्रसिद्ध मिस्त्री बच्चन सरवदे, माजी सरपंच जगदीश सुतार, माजी उपसरपंच विठ्ठल काका देशमुख, ग्रामस्थ आणि भाविक उपस्थित होते.