दोंडाईच्यात पुन्हा दिवसा पाच लाखांच्या आत जबरी घरफोडी….
डॉ. राजेंद्र गुप्ता यांचे सानेगुरुजी काँलनीतील घर चोरांनी केले टारगेट….
दोंडाईचा पोलीसांना चोरांचे रोज आव्हान-शहराला अवैध धंदे मुक्त व चोरींवर अंकुश ठेवणाऱ्या डँशींग अधिकाऱ्याची गरज असल्याचे मत….
दोंडाईचा- सध्या दोंडाईचा शहरात धुळे पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपूर श्री अनिल माने साहेब यांनी मानो या ना मानो पण ड्युटीवर नेमलेल्या तिवारी साहेबांच्या राज्यात-काळात दोंडाईचा शहरात जनतेच्या तिजोऱ्या-माल सुरक्षित नसल्याचे घटनाक्रम दिवसेंदिवस घडत आहेत. त्यामुळे चोऱ्यांनी भयभीत-कायद्याने सज्ञान लोकांचा आक्रोश होणे स्वाभाविक आहे. म्हणून आज दिनांक ८ एप्रिल शुक्रवार रोजी सुद्धा दिवसा डॉ. गुप्ता यांच्या राहत्या घरी भरवस्तीत पाच लाखांच्या आत जबरी घरफोडी झाल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे व ही असुरक्षिततेची भावना दुर करण्यासाठी येथे एका सक्षम-अनुभवी-आँल एक्स्पर्ट-सर्वगुण संपन्न-डँशींग अधिकाऱ्याची नितांत आवश्यकता असल्याचे मत चोरींच्या घटनांनपासुन दु:खी व कायद्याने सुज्ञ जाणकार गावातील नागरिक व्यक्त करत आहे.आज दोंडाईचा शहरात कायदा व सुव्यवस्था बाधित राखण्यासाठी पोलीस निरीक्षक श्री दुर्गेश तिवारी यांना आजच्या तारखेत जवळजवळ एक वर्षे पूर्ण झाली आहे. एक चांगले व्यक्ती म्हणून व धार्मिक व्यक्ती म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. पण गावात लहान-लहान चोऱ्या,जबरी घरफोड्या,मोबाईल चोरी, अवैध धंदे,बनावट दारू,गांजा-भांग,विमल गुटखा,प्लास्टिक बंदी,आईपीएल सारखे सट्टा बेटिंग यासारखे अनेक अवैध धंद्यावर त्यांची पकड नसल्याचे अनेक वेळा आयजी पथक, राज्य उत्पादन पथक व वरिष्ठ अधिकारी यांनी दोंडाईच्यात येउन केलेल्या धडक कार्यवाही वरून लक्षात आले आहे. एवढेच काय ऐकवेळा नाही तर दोनवेळा पोलीसांवर अवैध धंदे व कायद्याने चुकलेल्या व्यक्तीने मारहाण केल्याचा घटना गावात जगजाहीर आहे. पण त्यात झाले काय एकही गुन्हा दाखल झाला नाही. त्यामुळे गावात पोलीसांची प्रतिमा वाढली नसुन उलट हया घटनाक्रमातुन अवैध धंदे वाल्यांची हिमंतच वाढली आहे. म्हणून पोलीस निरीक्षक तिवारी आल्यापासुन गावात दिवसेंदिवस दिवसाढवळ्या घर-दुकानां पुढून मोटरसायकल चोरी नेहमीची बाब झाली असुन, आजही अनेकांना आपल्या मोटरसायकली पोलीस तपासातुन परत मिळून आलेल्या नाही आहेत. त्यानंतर सुरूवातीला चोर रात्री घरात-दुकानात चोरी करायचे लक्ष गाठत होते. मात्र तेही आता तिवारी साहेबांची कार्यशैली पाहून दिवसाढवळ्या घरात लाखोची चोरी करायचे लक्ष गाठत आहे. त्यात चोरी झालेल्या घटनांचे दाखले द्यायचा विचार केला तर हे पेज अपुर्ण पडेल. म्हणून मागे ज्या घटना झाल्या आहेत. ते दैनिकांमधुन प्रसिद्ध होत,पोलीस दप्तरी त्यापेक्षा अधिक घटनांची नोंद मिळेल.म्हणून आज गावाला नुसता चांगला-धार्मिक व्यक्ती नको तर त्यासोबत चोरी,जबरी घरफोडी,मोबाईल चोरी,अवैध धंदे, बनावट दारू,गांजा-भांग,विमल गुटखा, प्लास्टिक बंदी,आईपीएल सारख्या अवैध धंदे कायम स्वरूपी बंद करत पोलीस विभागाचे नाव उंचावणाऱ्या खऱ्या डँशींग पोलीस अधिकाऱ्याची गरज आहे.आज गावात सानेगुरुजी काँलनीत भरदिवसा डॉ. राजेंद्र राधेश्याम गुप्ता यांच्या पुढे क्लिनिक असलेल्या व मागे वडील-भाऊ राहत असलेल्या घरी अज्ञात चोरांनी दुपारी अकरा ते बारा वाजेची संधी साधुन दरवाजाचा कडीकोंडा तोडून,आत प्रवेश करत घरातील कपाटात ठेवलेले तीन (३) तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र,साडेपाच (५.५) ग्रँम वजनाच्या सोन्याच्या तीन अंगठ्या, चार(४) ग्रँम वजनाची सोन्याची गिन्नी,दोन(२) ग्रँम वजनाची सोन्याची कानातली टाँप,चार(४)ग्रँम वजनाची सोन्याची कानातली रिंग व पंच्चेचाळीस ते पन्नास हजार रुपये रोख असे ऐकूण अंदाजित पाच लाख रूपयाच्या आत चोरी झाल्येल्या घटनेची प्राथमिक माहिती तक्रारदार डॉ. गुप्ता व कुटूंबियानी दिली आहे. म्हणून मा .पोलीस अधीक्षक, धुळे व उपविभागीय पोलीस अधिकारी, शिरपूर श्री अनिल माने यांनी मानो या ना मानो पण तिवारीं साहेबांच्या राज्यात-काळात जनतेच्या तिजोऱ्या-माल सुरक्षित नसल्याच्याच घटना अधीक घडत असल्याने जनता स्वतः ला व कष्टाने कमविलेल्या आपल्या मालाला असुरक्षित समजत असल्याची भावना त्याच्यात निर्माण झाली आहे. म्हणून आपण लहान-लहान चोऱ्या,जबरी घरफोड्या,मोबाईल चोरी, अवैध धंदे, बनावट दारू,गांजा-भांग,विमल गुटखा, आईपीएल आदी अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करून गावात-जनमानसात पोलीस विभागाची उंची वाढवणाऱ्या डँशींग अधिकाऱ्याची नियुक्ती केली तर हे सर्व चित्र बदलेल व अशी खरी गरज असल्याचे मत,गावात चोरींपासुन दु:खी व कायद्याने सज्ञान असलेले नागरिक व्यक्त करत आहे.