करमाळा :- श्री छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक ते श्री कमलाभवानी मंदिर श्री.देवीचामाळ रस्ता,आयडीबीआय बँकेच्या जवळ मोठ्या ओढ्या वर असलेल्या पुलाचा संरक्षक कठडा तुटलेल्या अवस्थेत आहे. गेल्या आठ महिन्यांपासून हे काम आर्धवट राहीले आहे. या रस्त्यावरून शाळकरी मुले, बाजार करायला येणारे नागरिक ,कामगार ,शेतकरी ,ऊसाची वाहने ट्रॅक्टर ट्रॉली मालवाहतूक करणारे ट्रक ,सार्वजनिक वाहतूक करणारी बस ,रिक्षा ,दुचाकी तसेच या भागात आयडीबीआय बँक, आयसीआयसीआय बँक , मुख्य बाजारपेठेत जाणाऱ्या रस्ता असल्यामुळे येथे खूप वर्दळ असते येथे जीवित हानी होऊन मोठा अपघात होण्याची दाट शक्यता असल्याचे निवेदन दत्तात्रय काटकर यांनी मुख्याधिकारी करमाळा नगर परिषद यांना दिले.
यावेळी काटकर यांनी सांगितले की, सदर रस्त्यावरून अनेकजण जात आहेत परंतु इतर कोणाचेही लक्ष या गोष्टीकडे गेले नाही परंतु आम आदमी पार्टीने आवाज उठवित सदर काम करण्याबाबत निवेदन दिलेले आहे. हे काम लवकर पुर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे ही काटकर यांनी सांगितले.
