July 1, 2025 7:40 am

महागाई मुक्त भारत आंदोलन इंदापूर तालुक्यात युवक काँग्रेस अध्यक्ष मिलिंद साबळे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी

अपनी भाषा में पढ़े! Translate

महागाई मुक्त भारत आंदोलन इंदापूर तालुक्यात युवक काँग्रेस अध्यक्ष मिलिंद साबळे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी

प्रतिनिधी:- संतोष सोनटक्के

इंदापूर:- दिनांक 7 एप्रिल रोजी
इंदापूर युवक काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद साबळे यांच्या नेतृत्वात महागाई मुक्त भारत आंदोलन घेण्यात आले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चेअध्यक्ष माननीय श्रीनानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष कुणालजी राऊत आणि महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस विजयसिंह चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर युवक काँग्रेसच्या वतीने गुरुवार दिनांक 7एप्रिल 2022 रोजी 11वाजता इंदापूर येथे महागाई मुक्त भारतआंदोलन करण्यात आले.
केंद्रातील भाजप सरकारने पेट्रोल ,डिझेल, गॅस सिलेंडर ,जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ करून सर्वसामान्य जनतेस वेठीस धरण्याचे काम केले आहे . यामुळे सर्वसामान्य जनतात्रस्त झाली आहे .काँग्रेसच्या काळात 65 रुपये प्रति लिटर होते.पण आज पेट्रोल121प्रति लिटर झाले आहे. महागाई मुक्त करायचे असेल तर मोदी सरकारला घरी बसवावे लागेल असे युवक काँग्रेस इंदापूर तालुक्याचे अध्यक्ष मिलिंद साबळे म्हणाले.
यावेळी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अरुण राऊत,इंदापूर शहर युवक काँग्रेस उपाध्यक्ष सुफियान जमादर,इंदापूर युवक सरचिटणीस संदीप शिंदे ,अनिकेत जाधव, योगेश सुतार सिद्धार्थ गायकवाड व युवक काँग्रेसचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!