दौंड – दौंड ला मिळाला अजब ठेकेदार अतिक्रमण न हटवता रोडचे काम सुरूच वंचित चा आरोप
प्रतिनिधी – विकी ओहोळ
दौंड – दौंड शहरातून जाणारा अष्टविनायक महामार्ग हा पहिल्या टप्प्यापासून वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. इस्तिमेंट प्रमाणे 16 मीटर चा असताना शहरातून 7 मीटर चा करण्यात आला आहे त्यातही काही ठिकाणी अनेक अतिक्रमणामुळे कमी जास्त झाला आहे काही ठिकाणी अर्धवट सोडलेल्या अवस्थेत आहे या ठिकाणी रोज लहान मोठे अपघात होत आहेत या कडे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 5 एप्रिल रोजी दौंड नगर परिषदेवर धडक मोर्चा काढण्यात आला होता या मार्गातील काही ठिकाणी चे गरीब जनतेचे घरे, सिद्धार्थ नगर येथील समाज मंदिर विकासाच्या कामासाठी हटवण्यात आले तर इतर मंदिरे किंवा रस्त्यात अडथळा निर्माण होणारे अतिक्रमण का हटवलं जात नाही असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आला.या मध्ये मनमानी कारभार चालू आहे असा आरोप केला आहे.या वेळी नगरपरिषदेला निवेदन देण्यात आले त्यावेळी वंचित चे अश्विन वाघमारे,मा. नगर सेवक राजेश गायकवाड , बंटी वाघमारे,अक्षय शिखरे,अजिंक्य गायकवाड,आनंद रणधीर,राहुल नायडू,पिंकू झेंडे,आदी कार्यकर्ते सहभागी होते, निवेदनाची प्रत दौंड नगरपरिषदेचे उप मुख्याधिकारी गुरव मॅडम ,पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांना देण्यात आले, सदर मागणी मान्य न झाल्यास नगर परिषदेला ताळे लावण्यात येणार आहे असा इशारा देण्यात आला.