मदनवाडी विकास सोसायटीच्या चेअरमनपदी विष्णू देवकाते यांची निवड.
(निलेश गायकवाड)
भिगवण दि. 3 मदनवाडी (ता. इंदापूर) विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी दुसऱ्यांदा श्री विष्णू मच्छिंद्रनाथ देवकाते व व्हाईस चेअरमनपदी श्री दिलीप दत्तात्रय ढवळे यांची निवड झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद राऊत व मदतनीस सुरेश देवकाते, विजय देवकाते यांनी दिली. यावेळी संचालक मंडळांमधील सर्जेराव गुलाब देवकाते, पदमसिंह साहेबराव देवकाते, नंदकुमार रंगनाथ देवकाते, भगवान बाबासो बंडगर,अरविंद भरत देवकाते, विनायक भगवान देवकाते,सुरेखा दादासाहेब ठोंबरे, संगीता लाला कुंभार,बाळू नाना वचकल ,रोहिदास वामन देवकाते,गौतम नारायण सवाणे आदी उपस्थित होते.
चेअरमनपदी निवड झाल्यानंतर विष्णु देवकाते यांचे कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक प्रकाशबापू ढवळे, भगवानराव बंडगर,मदनवाडीच्या माजी सरपंच ताई आजिनाथ सकुंडे, शरद चितारे, संजय सवाणे विजयराव देवकाते, रवींद्र देवकाते, प्रल्हाद आनंदराव देवकाते यांनी अभिनंदन केले आहे.