वालचंदनगर पोलीस स्टेशन ची कामगिरी दमदार :रणगांव प्रकरणी दरोडेखोरांना केले गजाआड
(निलेश गायकवाड)
इंदापूर तालुक्यातील रणगांव येथील कर्मयोगी कारखान्याच्या माजी संचालकाच्या घरी अज्ञात दरोडेखोरांनी दि.२७ डिसेंबर २०२१ रोजी मध्यरात्री १ ते दीड वाजण्याच्या सुमारास दरोडा टाकला होता.यामध्ये तब्बल ६ लाख ६३ हजार २०० रुपयाचा ऐवज या दरोडेखोरांनी लुटला होता. याबाबत वालचंदनगर पोलीस ठाण्यात सौ.सुनंदा राजेंद्र गायकवाड वय 55 वर्ष रा. गायकवाडवस्ती रणगांव ता.इंदापूर जि.पुणे यांच्या फिर्यादीवरुन भा.द.वि. कलम 395,397 प्रमाणे अज्ञात दरोडेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वालचंदनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल असून सदर गुन्हयाचा तपास डॉ.अभिनव देशमुख पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण,मिलींद मोहीते अपर पोलीस अधिक्षक बारामती विभाग, गणेश इंगळे उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग यांचे मार्गदर्शनाखाली तपास करीत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखा पुणे ग्रामीण यांचे मदतीने तांत्रीक माहीतीच्या आधारे तपास करून सदर गुन्हयातील पाच आरोपींची नांवे निष्पन्न झाली आहेत.

वालचंदनगर पोलीसांनी या प्रकरणी पाच आरोपींना अटक केली असून आरोपी होमराज उर्फ होम्या उध्दव काळे वय 40 वर्षे रा. वाकी शिवार ता.आष्टी जि.बीड, अजय उर्फ आभ्या सुभाष भोसले वय 23 वर्षे,सचिन उर्फ आसी सुभाष भोसले वय 24 वर्षे, अविनाश उर्फ आवी उर्फ महींद्रा सुभाष भोसले वय 22 वर्षे. सर्व रा.माहीजळगाव ता.कर्जत जि अहमदनगर व राहुल उर्फ काळ्या पटु भोसले वय 28 वर्षे रा वाकुन पारगाव पो.पाथर्डी ता.जि. अहमदनगर या आरोपींना सातारा जिल्हा कारागृह येथुन दि. 04 एप्रिल 2022 रोजी अटक करण्यात आली आहे.त्यांना मा.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो इंदापुर यांसमोर मंगळवार दि.०५ एप्रिल २०२२ रोजी हजर केले असता न्यायालयाने दि.११ एप्रिल पर्यंत ७ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सदर आरोपींना वालचंदनगर पोलीसांनी ताब्यात घेतल्यानंतर मंगळवार दि.०५ एप्रिल ला वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्हा आरोपींनी कशा पद्धतीने कोणत्या मार्गाने केला. त्याकरीता येण्याजाण्याचा कोणाता मार्ग अवलंबिला होता याचा वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहा.पो.निरीक्षक बिरप्पा लातुरे आणि त्यांच्या सहकार्यांनी तपास केला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सखोल पद्धतीने चालु असल्याने लातुरे यांनी सांगितले.
सदर आरोपी हे मा.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो.वडुज न्यायालय, जि. सातारा यांचे न्यायालयीन कोठडीत होते.वालचंदनगर पोलीसांना सदरच्या गुन्ह्यात वरील आरोपींची नांवे निष्पन्न झाल्याने त्यांना पुढील तपासकामी दि.०४ एप्रिल रोजी अटक केली आहे.आरोपींकडून वालचंदनगर पोलिसांना अद्याप कोणताही मुद्देमाल मिळालेला नसून गुन्ह्याचा तपास वालचंदनगर पोलीस करीत आहेत.यामध्ये API लातुरे, PSI खदारे, सहा पोलीस उपनिरीक्षक रतिलाल चौधर, सहा पोलीस उपनिरीक्षक शिवाजी निकम, पोना पाटमास पोना स्वामी ,पोकॉ अमोल चितकोटे, पोना अमर थोरात ,पोना विनोद पवार यांनी पोलीस तपासात सहभागी होत आरोपींना गजाआड केले .