येत्या २-३ दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा तर विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा
राज्यात येत्या चार दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसात विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहिल. उद्या मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वीजांचा कडकडाट होण्याची, तर तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे.
गेल्या चोवीस तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पहाटे आणि सकाळी काही भागात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर कोकणात काही ठिकाणी कमाल तापमान सरासरीपेक्षा बरंच जास्त होतं.
मराठवाड्यात ते सरासरीपेक्षा किचिंत जास्त होतं. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान अकोला इथं ४४ पूर्णांक १ दशांश अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. अहमदनगर, जळगाव, मालेगाव, नाशिक, सोलापूर, औरंगाबाद, परभणी, नांदेड, अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वाशिम, वर्धा, याठिकाणी तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होतं.