July 1, 2025 1:28 am

चंद्रपूरमधील लाडबोरी इथं पडलेलं धातूचं कडं हा उल्कापिंड नसल्याचे स्पष्ट

अपनी भाषा में पढ़े! Translate

चंद्रपूरमधील लाडबोरी इथं पडलेलं धातूचं कडं हा उल्कापिंड नसल्याचे स्पष्ट
प्रतिनिधी-विजय केळझरकर
चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी इथं पडलेलं धातूचं कडं हा उल्कापिंड नसल्याचं तज्ञांनी स्पष्ट केलं आहे. काल संध्याकाळी पावणे आठच्या सुमाराला आकाशात अद्भुत दृश्य पाहायला मिळालं. मिसाईल सारखी एक वस्तू पश्चिमेकडून पुर्वेकडे गेली. त्यांनतर आकाशात थोड्या वेळानं बॉम्ब फुटल्यासारखा आवाज आल्यानं लाडबोरी इथल्या नागरिकांमधे भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. लोकांनी स्वतःला घरात बंद करून घेतलं.काही लोकांनी या घटनेला, युक्रेन युद्धाशी जोडून,रशियानं हल्ला केल्याची अफवा पसरवली, पण नंतर घटनास्थळी जिल्हाप्रशासन आल्यानं अफवा थांबल्या. आकाशातून भलीमोठी धातूची तप्त रिंग पडल्याचं स्पष्ट झालं.

न्यूझीलंडमधल्या माहीया द्वीपकल्पावरुन भारतीय वेळेनुसार काल संध्याकाळी ६ वाजून ११ मिनिटांनी तिथल्या रॉकेट लॅब कंपनीच्या इलेक्ट्रॉन रॉकेट द्वारे ब्लॅकस्काय नावाचा उपग्रह पृथ्वीच्या ४३० किमी उंचीवर नेऊन स्थिरावण्यात आला. इशान्य महाराष्ट्रात दिसलेली कथित उल्का ही या इलेक्ट्रॉन रॉकेटच्या बुस्टर असावेत, आपल्या भागात साधारण तीस ते पस्तीस किमी उंचीवरून बुस्टर वातावरणाशी घर्षण झाल्यानं एकामागोमाग एक असे ते जळत गेले. दिसणाऱ्या घटनेचा मार्ग आणि प्रकाशमान याचा अंदाज घेतला तर ही कोणतीही, उल्का वर्षाव किंवा उडती तबकडी सारखी घटना नाही, असं एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र, औरंगाबादचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी सांगितल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

अवकाशातले ते अवशेष सिंदेवाही तालुक्यात लाडबोरी इथं पडले. आठ ते दहा मीटर व्यासाचं हे कडं पोलीस ठण्यात आणून जमा केल्यान निरनिराळ्या चर्चांना विराम मिळाला. असेच अवशेष गडचिरोली जिल्ह्यातल्या आरमोरी भागात पडल्याची माहीती जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिली आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!