महागाईच्या विरोधात शिवसेना – युवासेनेचे राज्यभर ‘थाळी बजाओ’ आंदोलन
प्रतिनिधी-अर्जुन आहेर
महागाईच्या विरोधात शिवसेना – युवासेना राज्यभर ‘थाळी बजाओ’ आंदोलन करत आहे. मुंबईत केंद्र सरकारच्या विरोधात थाळी वाजवत आणि घोषणा देत शिवसेना – युवासेनेनं आज वेसावे, विलेपार्ले, वांद्रे, गोरेगाव, भायखळा, वरळी, लालबाग, शिवडी इत्यादी ठिकाणी निदर्शनं केली.
पेट्रोल, डिझेल, औषधन, भाज्या, अंडी आदी वस्तूंच्या वाढत्या दरांविरोधात शिवसेना – युवासेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या. घोषणा देत आणि फलक दर्शवत कार्यकर्त्यांनी महागाईविरोधात आंदोलन केलं.
महागाई विरोधात आज नंदुरबार जिल्ह्यात शिवसेनेनं धडगावमध्ये थाली बजाव आंदोलन केलं. नंदुरबार शहरातही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अंधारे चौकात आंदोलन करत केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.
महाराष्ट्र राज्य लोक सेवा आयोगाचं परीक्षा केंद्र जवळच असल्यानं त्यांना थाळी वाजवायला मज्जाव करण्यात आला. त्यामुळे फक्त घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी याठिकाणी केंद्राच्या विरोधात निषेध नोंदवला.