रिधोरे गावात “आधार- मोबाईल लिंकिंग” विशेष शिबिराला उदंड प्रतिसाद…
दि. 31 मार्च, प्रतिनीधी – दत्तात्रेय पतुले
दिनांक 28/03/2022 व 29/03/2022 रोजी,दोन दिवसांचे, रिधोरे गावात भारतीय डाक विभाग व क्रिसिल फौंडेशन यांचे संयुक्त विद्यमाने, आधार मोबाईल लिंकींग विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या विषेश शिबिरास गावातील शेतकरी, महीला बचत गट सदस्य, विद्यार्थी, वयोवृद्ध नागरिक यांनी उदंड प्रतिसाद दिला. या दोन दिवसांच्या शिबिरात एकूण 300 पेक्षा जास्त लोकांचे लिंकींग करण्यात आले.आधार कार्ड मोबाईल लिंकींग सर्व शासकीय योजना व इतर शासकीय कामासाठी अनिवार्य करण्यात आले असल्यामुळे ते करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. गावात आयोजित केलेल्या शिबिरामुळे ग्रामस्थांना गावातच अतिशय चांगल्या प्रकारे सुविधा उपलब्ध झाली आहे. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी भारतीय डाक विभागामार्फत श्री.शुभम कुडवे व श्री.योगेश खंबायत व क्रिसिल फौंडेशन मार्फत श्री.अविनाश शिंदे श्री.महेश गायकवाड श्री.सुशील भोसले श्री.विनय महाडीक व श्री.समाधान गायकवाड यांनी विषेश शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.