कासारवाडी येथील जवान विठ्ठल खांडेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!- पालकमंत्री भरणे
जम्मू काश्मीर मध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलात कार्यरत असलेले बार्शी तालुक्यातील कासारवाडी येथील जवान विठ्ठल रामा खांडेकर यांचा जम्मू येथे सराव सुरू असताना चक्कर आल्याने वीरमरण येऊन मृत्यू झाला. त्यांचे वय ४० वर्षे होते.
विठ्ठल खांडेकर यांच्या निधनाची वार्ता समजताच पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी ट्विट करत विठ्ठल खांडेकर यांना श्रद्धांजली अर्पण केली. यामध्ये ते लिहितात
” कासारवाडी ता. बार्शी गावचे सुपुत्र, CRPF चे जवान विठ्ठल खांडेकर यांना कर्तव्य बजावत असताना जम्मू येथे वीर मरण प्राप्त झाले. खांडेकर कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची बळ मिळो, विठ्ठल यांना भावपूर्ण श्रद्धांजली ! “