June 30, 2025 3:12 am

अट्टल चोरटा अमळनेर पोलीसांच्या जाळ्यात

अपनी भाषा में पढ़े! Translate

अट्टल चोरटा अमळनेर पोलीसांच्या जाळ्यात

अमळनेर पोलीस स्टेशन हद्दीत मा . पोलीस अधिक्षक सो . जळगांव यांच्या सुचने प्रमाणे विविध गांवाना ग्राम सरंक्षक पथके स्थापण करण्यात आले असुन सदर ग्राम सरंक्षक पथकातील सदस्यांचे रात्रगस्त करण्याचे योग्य नियोजन करण्यात आले आहे . त्यानुसार दि . २७/०३/२०२२ रोजी मंगरुळ ता . अमळनेर येथील रात्रगस्तकामी असणारे ग्राम सरंक्षण पथकास एक संशयित मिळुन आला होता . सदर पथकातील सदस्यांनी लागलीच पोलीस वाहनास फोन करुन त्याबाबत दिली असता पोलीस वाहन तात्काळ सदर ठिकाणी पोहचले . त्यांनतर पोलीस वाहनांस पाहताच संशयित इसम बेसावध ग्राम सरंक्षक पथक सदस्याच्या हाताला झटका देवुन पळुन गेलो होता . परंतु त्यापुर्वी सदर संशयिताचा फोटो काढण्यात आला होता . त्यावरुन अमळनेर पोलीस सदर संशयिताचे मागावर असतांना तो प्रशांत जगन वारडे रा . गोरगावले ता.चोपडा अशी प्राथमिक माहीती मिळाली होती . त्याच आधारावर सदर संशयित इसमाचा शोध सुरु होता . परंतु सदर संशयित हा अट्टल चोर असल्याने तो नियमित त्याचे वास्तव्याचे ठिकाण बदलत होता . दि . २८/०३/२०२२ रोजी पो.नि. श्री . जयपाल हिरे यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की , वरील घटनेतील संशयित हा सुरत राज्य गुजरात येथे लपुन बसला आहे . त्यावरुन लागलीच पोना . २२०४ मिलींद भामरे , पोना . १३४४ सुर्यकांत साळुंखे , पोकाँ . १३११ निलेश मोरे अश्यांचे पथक तयार करुन त्यांना सुचना व मार्गदर्शन करुन तात्काळ सुरत येथे रवाना केले व सदर संशयित इसमास कडोदरा पोलीसांच्या मदतीने कडोदरा पोलीस स्टेशन हद्दीतुन अत्यंत शिताफिने ताब्यात घेवुन अमळनेर पोलीस स्टेशन येथे परत आले . सदर संशयित इसमास पो.नि. श्री . जयपाल हिरे यांना विश्वासात घेवुन विचारपुस करता त्याने अमळनेर पोलीस स्टेशन हद्दीतुन गु.र.न. ४१ / २०२२ भा.द.वि. कलम ३७ ९ प्रमाणे दाखल गुन्ह्यांतील चोरी केलेली हिरो होंडा पँशन प्रो मो.सा. क्र.एम.एच .१ ९ ए.डब्ल्यु , ९ २०३ काढुन दिली असुन त्यास अधिक विचारपुस करता त्याने अधिक खालील प्रमाणे माल काढुन दिलेला आहे . १ ) ०३ मोटर सायकल , २ ) ०३ लॅपटॉप , ३ ) ०१ चार्जर , ४ ) ॲण्ड्रॉईड व साधे मोबाईल एकुण ० ९ , ५ ) ०२ पितळी समई , ६ ) ०१ शटर फोडण्याचे / तोडण्याचे कटर येणे प्रमाणे वरील आरोपी नामे प्रशांत जगन वारडे वय २६ रा . गोरगावले ता.चोपडा यांस अमळनेर पो.स्टे . गु.र.न. ४१/२०२२ भा.द.वि कलम ३७ ९ प्रमाणे गुन्ह्यांत अटक करण्यात आली आहे . सदर आरोपीतां कडुन अमळनेर पो.स्टे . कडील ०१ गुन्हा , चोपडा शहर पो.स्टे . कडील ०४ गुन्हे उघडकीस आले आहेत . सदर आरोपीतांवर यापुर्वी चोपडा शहर पो.स्टे . व सुरत राज्य गुजरात येथे बरेच गुन्हे दाखल असल्याचे समजुन येत आहे . तसेच सदरचे गुन्हा उघडकीस आणणेकामी पो.नि.श्री . जयपाल हिरे यांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाखाली पोहेकाँ . २६३८ शरीफखान पठाण , पोना . २२०४ मिलींद भामरे , पोना . १३४४ सुर्यकांत साळुंखे , पोना . ३०५१ सिध्दांत सिसोदे , पोकाँ . १३११ निलेश मोरे यांनी सदरची कामगिरी केली आहे .

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!