June 30, 2025 1:29 pm

राज्यमंत्री माननीय श्री. दत्तात्रय मामा भरणे यांच्या हस्ते गिरवी गावामध्ये विविध विकास कामांची उद्घाटने.

अपनी भाषा में पढ़े! Translate

राज्यमंत्री माननीय श्री. दत्तात्रय मामा भरणे यांच्या हस्ते गिरवी गावामध्ये विविध विकास कामांची उद्घाटने.

प्रतिनिधी: समाधान रजपूत

इंदापूर तालुक्यातील गिरवी गावामध्ये इंदापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे मामा यांच्या हस्ते 5 कोटी 62 लाख रुपयांच्या विविध विकास कामाची उद्घाटने करण्यात आली. यामध्ये गिरवी गावातील अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा योजना, मंदिर सभामंडप, दफनभूमी आदी कामांची नारळ फोडून उद्घाटने करण्यात आली. यावेळी दादा शिरसागर ,प्रशांत पाटील आणि भरणे मामा यांची भाषणे झाली गावातील ग्रामस्थांनी यावेळी भरणे मामांचा सत्कार केला आणि त्यांची गिरवी गावातून घोड्यावरून मिरवणूक काढली.यावेळी गावातील प्रतिनिधी: डॉ. सिद्धार्थ सरवदे,
सरपंच -उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व तालुक्यातील ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते.

इंदापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार व राज्यमंत्री माननीय श्री.दत्तात्रेय मामा भरणे म्हणाले की माझ्या विरोधकांनी वीस वीस वर्ष मंत्रीपदे भोगली तरी त्यांना इंदापूर तालुक्यातील गावांचा विकास करता आला नाही पण मी दोन वर्षे राज्य मंत्री झालो तर प्रत्येक गावाला जातीपातीचे राजकारण न करता कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. मी दिखावा करत नाही तर काम हे माझ्या रक्तातच आहे इथून पुढे ही कुठल्याही गावाला कितीही निधी लागला तर मी सढळ हाताने द्यायला तयार आहे व लोकांची सेवा सदैव अशीच करत राहीन.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!