June 30, 2025 9:01 pm

“बळीराजा” च्या प्रदेश उपाध्यक्षपदी माऊली जवळेकर यांची निवड झाल्याबद्दल सत्कार!

अपनी भाषा में पढ़े! Translate

“बळीराजा” च्या प्रदेश उपाध्यक्षपदी माऊली जवळेकर यांची निवड झाल्याबद्दल सत्कार!

पंढरपूर प्रतिनिधी गणेश ननवरे

बळीराजा शेतकरी संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी माऊली जवळेकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांच्यावर सर्व भागांमधून सर्वस्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. यानिमित्ताने जिवलग मित्र परिवार वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.

माऊली जवळेकर यांनी सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांच्या सततच्या प्रश्नावर आवाज उठवला आहे तसेच शेतकऱ्यांच्या प्रत्येक अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील असतात आवकाळी पाऊस, गारपीट, महापूर काळात माऊली जवळेकर सर्व समाजघटकातील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले. यापुढे ही शेतकऱ्यांसाठीचा लढा कायम सुरुच राहील अशी ग्वाही यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली जवळेकर यांनी दिली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नागेश उपासे, पटवर्धनकुरोली ग्राम पंचायत सदस्य अनिल सावंत, युवा नेते शिवाजी नाईकनवरे,अस्लम आतार, सिध्देश्वर नाईकनवरे, संतोष घुले, शिवाजी उपासे, समाधान काळे राधेश्याम पाटील विनायक नाईकनवरे, सागर मलशेट्टी, गणेश देशमुख, दसरथ जवळेकर, सोमनाथ जाधव, राजेंद्र जवळेकर, पांडुरंग नाईकनवरे, रघुनाथ पाटील, सोमनाथ कोळसे, संभाजी उपासे, निलेश देशमुख शेतकरी उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!