June 30, 2025 2:33 pm

गाजा-वाजा न करता-आरोग्य सेवेपासुन वंचित असलेल्या आदिवासी पाड्यात लोकांना रूग्ण सेवा देत-दोंडाईच्यातील डॉक्टरने साजरा केला वाढदिवस….

अपनी भाषा में पढ़े! Translate

एकीकडे वैद्यकीय सेवेकेडे लोकांची बघण्याची विपरीत परिस्थिती-दुसरीकडे आपल्या अंगी असलेल्या कलागुणातुन मोफत उपचार करत डॉक्टरने दाखवली माणूसकी….

नुसती वैद्यकीय सेवाच काय?मला देवाने इतर शक्ती-पावर दिला असता तरी मी तळागाळातील जनतेची सेवाच केली असती-डॉ. निलेशकुमार पवार….

दोंडाईचा- सध्या आपण मागील वर्ष-दिड वर्षापासुन करोना व करोना काळातील वैद्यकीय सेवा-पोलीस-आरोग्य सेवा बाबत चांगलेच कमी-अधिक प्रमाणात प्रभावित झालो आहोत. मला येथे सर्वाच्या बाबतीत टाचणी टोचायची नाही आहे. यात बरेच विभाग व विभागातील अधिकारी-कर्मचारी अपवाद निघतील. म्हणजे त्यांचे ह्या कठिण काळातील काम खरोखरच अभिनंदनीय-प्रशंसनीय आहे. पण आजही ह्या मागील दिड वर्षातील-प्रसंगातील करोना-वैद्यकीय सेवा-पोलीस-आरोग्य सेवा यांची आठवण जरी काढली.तरी त्या विपरीत घटना-डॉक्टर-पोलीस-आरोग्य विभागाचा आड येत असलेला कर्तव्यपणा व आपले उदरनिर्वाहाचे काम-व्यवसाय बंद ठेवत.जवळचे नातलग-मित्रपरिवार-स्नेही सोडून गेल्याचा घटना व प्रत्येकाला आपली उपस्थिती नसल्याची पोकळी मनाला चटका देवून जातात. म्हणून ह्या काळात काही विभाग-क्षेत्र कमविणे सोडले तर प्रत्येकाने काहीना काही आणि फक्त न फक्त कमी अधिक प्रमाणात गमवलेलेच आहे.

त्यामुळे जीवन जगण्याची आर्थिक घडी आजही समाजातील थोड्याच घटकांकडे-विभागाकडे वाहत असुन, अजूनही इतर घटक स्थिरावला नसुन,दैनंदिन कुटुंब-पोटा-पाण्यासाठी रोज लढतोच आहे आणि हे चित्र भविष्याचा दुष्टीने भयावह आहे. म्हणुन पुर्वी जुने-जाणते व आजची करोना काळातील अनुभवाची धक्का खाणारी मंडळी हेच म्हणते.बाबा सर्व संघर्ष कर. पण दवाखाना-पोलीस स्टेशन व कोर्ट कचेरीच्या नादात पडू नको.पण जसे मी मगाशी म्हटलो की,सर्वच क्षेत्रातील लोक सारखी विचारसरणीची नसतात. त्याला बरेच-अनेक अपवादही असतात आणि असेच काही वैद्यकीय क्षेत्रातील-फारसे पैसे न कमविता, रूग्णांबद्दल मायाळू-दयाळू- माणसाळलेले अपवाद व्यक्तीमत्व म्हणजे दोंडाईचा शहरातील श्री गणेशा क्रिटिकल केअर सेंटरचे सुप्रसिद्ध धन्वंतरी ऱ्हदयरोग तज्ञ डॉक्टर नीलेशकुमार पवार हे होय.नुकताच त्यांचा वाढदिवस २५ मार्च रोजी झाला.मात्र त्यांनी व त्यांच्या श्री गणेशा क्रिटिकल केअर सेंटरच्या टीमने प्रत्येकाने आपला वाढदिवस गावात कोणताही मोठा गाजा-वाजा करत साजरा न करता. धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील एक गाव निवडत म्हणजे ज्याही आदिवासी पाड्यात-ग्रामीण भागात वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसेल,अशा ठिकाणी वाढदिवसनिमित्त कँम्प घेऊन जनतेची फुकटात विविध तपासणी करत रूग्णसेवा द्यायची, असे निश्चित केले आणि त्या अनुषंगाने वाढदिवसाच्या आठवड्यात येणारा रविवार दिवस निवडत त्यांनी नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी पुनर्वसन झालेले देवमोगरा गाव निवडत,जवळपास दीडशेच्या आत रूग्णांची तपासणी करून मोफत औषधोपचार केलेत.म्हणून वैद्यकीय सेवेतील मोफत उपचार करण्याची माणुसकी पाहून आदिवासी लोक गहिवरले.यावेळी त्यांच्या भावनांना बांध नव्हता व त्यांचे प्रेम पाहून डॉक्टर साहेबही भावनाशील होत.नुसती वैधकीय सेवाच काय?मला देवाने इतर शक्ती-जनसेवेचे पावर-अधिकार दिले असते तरी मी माझ्या जीवनात तळागाळातील जनतेची सेवाच केली असती,असे उद्गगार काढले.आज एकीकडे वैद्यकीय क्षेत्रातील जग समाजात स्थिर-उभे राहण्यासाठी कोणाचाही आर्थिक-शारिरीक विचार करता दैनंदिन वेगवेगळ्या मार्गाने स्पर्धा करत आहे. मात्र श्री गणेशा क्रिटिकल सेंटर व डॉ. नीलेशकुमार पवार साहेबांसारखे लोक चांगला दुरदुष्ट्रीकोन ठेवत. आजही समाजात मोफत उपचार-औषधे देत.रूग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानून, जीवन व्यतीत करत आहे.आज देवमोगरासारख्या अतिदुर्गम भागात जेथे लोकांना वैद्यकीय सुविधा पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध नसल्यावर,फक्त वाढदिवस हे कारण पुढे करत.रविवारसारखा सुटीचा,कुटूंबाला असणारा वेळ काढत,जनतेसाठी खर्च करण्याचा विचार करणे आणि तेही मोफत, याला वैद्यकीय क्षेत्रात मोठे काळीज लागते.आज त्यांनी त्या आदिवासी पाड्यात दिवसभर थांबून दिडशेच्यावर रूग्णांची तपासणी केली. त्यात प्रत्येक रूग्णांची बी.पी. व डायबिटीस म्हणजे शुगर तपासणी करून काहींचे ऱ्हदयरोग संबधीत रूग्णांची ईसीजी-कार्डियोग्राम करून मोफत उपचार केले. यावेळी काही अमेनिया- सिकलसेल आजाराने ग्रासलेलेही रूग्णही समोर आले. त्यांनाही उपचार-औषधे देत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी ह्या शिबीरात नंदुरबार जिल्हा परिषद सदस्य श्री केशरसिंग पाडवी यांचे मोलाचे मार्गदर्शन-सहकार्य लाभले.तर शिबीर यशस्वी करण्यासाठी बर्थडे बाँय डॉ. श्री निलेशकुमार पवार साहेब, डॉ. भुषण चौधरी, डॉ. मनीष गिरासे, डॉ. जगदीश चौधरी व डॉ. रामकुष्ण बोरसे आदींनी विशेष मेहनत घेतली.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!