June 30, 2025 9:10 pm

श्रीविठ्ठल सह.साखर कारखान्याचा वार्षिक अहवाल सभासदांना देणे:- अभिजीत पाटील

अपनी भाषा में पढ़े! Translate

श्रीविठ्ठल सह.साखर कारखान्याचा वार्षिक अहवाल सभासदांना देणे:- अभिजीत पाटील

६ गटामध्ये आणि कारखानास्थळावर स्क्रीन लावून सभासदांची सभेची सोय करावी

पंढरपूर प्रतिनिधी गणेश ननवरे

श्रीविठ्ठल सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा दि . ३० मार्च २०२२ रोजी असून त्याअगोदर सभासदांना वार्षिक अहवाल देण्यात यावा असे अभिजीत पाटील यांनी कारखाना प्रशासन पत्र व्यवहार केला आहे.
येणारी वार्षिक सर्वसाधारण सभा हि ऑनलाइन ठेवली आहे पण विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांकडे अँड्रॉइड मोबाईल नसल्यामुळे ते त्या वार्षिक सर्वसाधारण सभेला ऑनलाइन उपस्थित राहू शकत नाहीत त्यामुळे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशानुसार कारखाना कार्यस्थळावर मैदानाच्या 50 टक्के क्षमतेनुसार त्याठिकाणी एलईडी स्क्रीन, साऊंड सिस्टिम, मंडप, बोलण्यासाठी माइक व चहा पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यात यावी.
गेली तीन वर्ष आपल्या सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली नसून आगामी निवडणुकीमध्ये तीन वर्ष ऊस घातला नाही किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेस हजर नसेल तर सदस्यत्व व मतदानाच्या किंवा निवडणुकीच्या उभारण्यावर आक्षेप येऊ शकतो. तीस तारखेला होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये संचालक मंडळाने कुठूनही ऑनलाईन राहून फक्त सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावी व संचालक मंडळाने सभासदांना बोलण्यासाठी किंवा मत मांडण्यासाठी व सर्व सभासदांना तिथे हजर राहून बोलण्याची संधी द्यावी आणि आलेल्या सर्व सभासदांची सोय त्याठिकाणी कारखाना प्रशासनाने करून द्यावी किंवा गटवार स्क्रीन लावून सभासदांची सोय करण्यात यावी तसेच आम्ही सर्व सभासद कारखाना कार्यस्थळावर 50% क्षमतेनुसार त्याठिकाणी उपस्थित राहणार आहोत असे धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन मा श्री अभिजीत पाटील यांनी सांगितले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!