डिकसळ पुलाचे भाग्य उजळणार, ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी जुन्या पुलाचे होणार संवर्धन
(निलेश गायकवाड)
डिकसळ ता.इंदापुर ते कोंढार चिंचोली ता.करमाळा या जुन्या रेल्वे लाईन वरील ब्रिटिशकालीन पुलाचे मजबुतीकरण करण्यासाठी शासन दरबारी सतत पुराव्यानिशी लेखी पाठपुरावा कोंढार चिंचोली येथील मा. सरपंच देविदास साळुंके व राम जयवंत पाडुळे हे करत होते. त्या कामी अखेर यश आले असुन या पुलास गुरुवार दि. १७ मार्च २०२२ रोजी मुंबई येथील मुख्य अभियंता डिझाईन( पुल ) भोंगे साहेब, श्रीमती डोके आर.आर.मॅडम, कार्यकारी अभियंता डिझाईन(पुल ) पुणे ,श्रीमती एस एम थोरात मॅडम, उपअभियंता डिझाईन पुणे, डी. टी. थोरात ,असिस्टंट इंजिनीयर डिझाईन पुणे, गायकवाड उपअभियंता डिझाईन पुणे , तसेच सोलापूर जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम खात्याचे माळी साहेब अधीक्षक अभियंता सोलापूर, तेलंग साहेब कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज, के. एम.उबाळे उपअभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग करमाळा, व एस. एस. वाघ शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग करमाळा, यांनी संयुक्त दौरा केला. यावेळी इंदापुर तालुका राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष व महाराष्ट्र शासनाचे विशेष कार्यकारी अधिकारी विजयकुमार भगवान गायकवाड ,कोंढार चिंचोलीचे मा.सरपंच देविदास साळुंके ,राम पाडूळे, व डिकसळचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष भास्कर बाबुराव काळे उपस्थित होते. यावेळी भोंगे यांनी जुन्या पुलाविषयी दुरुस्तीबाबत सुचना सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना देऊन मार्गदर्शन केले व दुरुस्ती करतेवेळेस पुलावरील संपुर्ण माती काढुन पुलास गणआयटीग,तसेच काँक्रीटीकरण व डांबरीकरण करण्यात यावे ,पुलाच्या कामांनीना गेलेले तडे व विंग वॉलचा दुरुस्तीबाबत सूचना केल्या व याबाबत जरी सहा कोटीचे इस्टिमेट झाले तरी करा त्यास मंजुरी देण्यात येईल या पुलाचे मजबुतीकरण करून पूल हा पर्यटनाच्यादृष्टीने त्याचे जतन केले जाईल व पर्यटकांना त्याचा लाभ होईल तसेच नवीन होणाऱ्या पर्यायी पुलाविषयी मुख्य अभियंता भोंगेनी त्याचे डिझाइन कसे असावे याविषयी मार्गदर्शन केले व नवीन पुलासाठी ५० कोटीचा निधी अपुरा असून ८० कोटी रुपयांची मागणी करा अशा सूचना अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, यांना केल्या व सदर पुलाची उंची पूर्वीच्या पूलापेक्षा अकरा फुटाने उंच असावी तसेच त्याची रुंदी १२ मीटर करा व पूर्वीच्या पुलाची लांबी ४०० मीटर आहे नवीन पुलाची लांबी ४२० मीटर करून मधल्या भागाची रुंदी तीस फूट घेऊन पूलाच्या दोन्ही साईडला १५-१५ फुटाच्या साईट गॅलरी घ्यावी. जेणेकरून लोकांना त्याही पुलावरून पर्यटनाचा आस्वाद घेता येईल म्हणजेच मुंबई येथील समुद्रातील सी लिंक प्रमाणे केबल सेट डिझाईन असावे अशा मार्गदर्शक सूचना संबंधितांना केल्या, त्याकरीता ८० कोटीची मागणी शासना कडे करावी व वरील प्रमाणे एस्टिमेट करावे अशा सुचना प्रत्यक्ष पुलाची पहानी करून केल्या या सर्व अधिकाऱ्यांचे ग्रामस्थांच्यावतीने श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अधिकाऱ्यांनीही या पुलाचे काम मजबूत करू असे आश्वासन दिले.