July 1, 2025 7:37 am

जलजीवन मिशनच्या आढाव्याबाबत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील व आमदार रोहित पवार यांची विशेष बैठक, मतदारसंघात सुरू असणाऱ्या कामांना मिळणार अतिरिक्त निधी!

अपनी भाषा में पढ़े! Translate

जलजीवन मिशनच्या आढाव्याबाबत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील व आमदार रोहित पवार यांची विशेष बैठक, मतदारसंघात सुरू असणाऱ्या कामांना मिळणार अतिरिक्त निधी!
प्रतिनिधी.संदिप कायगुडे
कर्जत/जामखेड स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या दालनात कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत जलजीवन मिशनच्या आढाव्याबाबत बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान आमदार रोहित पवारांनी आपल्या मतदारसंघातील 70 पेक्षा अधिक गावातील योजनांना मंजुरी दिल्याबद्दल स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार व्यक्त केले. तसेच मतदारसंघातील या योजनेत समाविष्ट नसलेल्या उर्वरित गावांसंदर्भात या बैठकीत चर्चा झाली. काही योजना या निकषात बसत नसल्याने त्यात सुधारणा करणे व त्यामध्ये सोलारचा समावेश करणे गरजेचे होते. याबाबतही या बैठकीत चर्चा झाली. यासोबतच नवीन वर्षातील डीएसआर किमती बदलल्याने अनेक योजनांच्या किमतीत बदल होत आहे. त्याशिवाय जागतिक स्तरावर सुरू असलेल्या रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर स्टीलच्या दरात होत असलेली वाढ या सर्व गोष्टींचा परिणाम सध्या सुरू असलेल्या योजनांवर होत असल्याने योजनांचे दर बदलत होते.

संबंधित योजना मंजूर होऊनही दरडोई खर्च वाढल्याने सुधारित खर्चाच्या तपशिलासह या योजना मंजुरीसाठी सरकारकडे आणणे व त्याला सुधारित प्रशासकीय मान्यता देणे आणि जिल्हास्तरावर मंजूर असलेल्या योजनांचा आढावा घेणे व पूर्तता करून लवकरात लवकर योजना सुरू करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. यापूर्वी कर्जत व जामखेडमधील जास्तीत जास्त योजना मंजूर झाल्या असून उर्वरित दरडोई खर्चाला लागणाऱ्या प्रशासकीय मान्यतेनंतर राहिलेल्या योजनाही लवकरच मंजूर होतील व मतदारसंघातील राहिलेली सर्व कामे लवकरात लवकर सुरू होतील असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. आमदार रोहित पवार यांनी मतदारसंघात योग्य सर्वेक्षण करून घेतल्याने आणि स्वतः मतदारसंघातील बारीक गोष्टींकडे लक्ष दिल्याने आता विविध शासकीय योजनांचा लाभ मतदारसंघातील नागरिकांना होत असताना पाहायला मिळत आहे. तसेच नागरिकांच्या सोयीसाठी व त्यांच्या अडचणी समजून त्या सोडवण्यासाठी मी कायम प्रयत्नशील राहिलं असे देखील आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!