July 1, 2025 4:15 am

विधीमंडळ कामकाजाबाबत गांभीर्य न दाखवल्यानं बीड नगरपरिषदेचे ४ अधिकारी निलंबित

अपनी भाषा में पढ़े! Translate

विधीमंडळ कामकाजाबाबत गांभीर्य न दाखवल्यानं बीड नगरपरिषदेचे ४ अधिकारी निलंबित
प्रतिनिधी दादासाहेब नन्नवरे
विधीमंडळ कामकाजाबाबत गांभीर्य न दाखवल्यानं बीड नगरपरिषदेच्या चार अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची घोषणा काल नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी विधिमंडळात केली.

बीड नगरपालिकेतल्या विविध योजनांच्या भ्रष्टाचाराबाबत विनायक मेटे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. विधीमंडळात एखादा प्रश्न किंवा लक्षवेधी सूचना लागते तेव्हा त्यावर माहिती देण्यासाठी रविवारी नगर परिषदेचे अधिकारी आले होते. सोमवारी पुन्हा उपस्थित राहण्यास सांगितलं तर कोणीही आलं नाही, त्यांचे मोबाईलही बंद आहेत.

त्यामुळे पालिकेचा भोंगळ कारभार आणि जनतेच्या सुविधांची हेळसांड करण्याच्या आरोपांवरुन राहुल टाळके, सलीम याकुब, सुधीर जाधव आणि योगेश हांडे यांचं निलंबन करण्यात आलं आहे. नगरपरिषदेत झालेल्या अनियमिततेप्रकरणी मुख्याधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करण्यात येईल, दोषी आढळल्यास त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती तनपुरे यांनी दिली.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!