चीनसह अन्य देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका सतर्क
प्रतिनिधी-अर्जुन आहेर
चीनसह अन्य देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका सतर्क झाली आहे.
राज्याच्या कोरोना कृती दलानं काल एक बैठक आयोजित केली होती. कोरोनाची चौथी लाट थोपवण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत यावेळी चर्चा झाली. भारतात येत्या जूनमध्ये कोरोनाची चौथी लाट येईल असा अंदाज कानपुर आयआयटीनं वर्तवल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या कोरोना कृती दलानं मार्गदर्शन करावं अशी मागणी मुंबई महापालिकेनं केल्याची माहिती टास्क फोर्सचे डॉ संजय ओक यांनी दिली.