July 1, 2025 12:27 am

मराठवाड्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी इस्रायलची कंपनी करणार मदत

अपनी भाषा में पढ़े! Translate

मराठवाड्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी इस्रायलची कंपनी करणार मदत
प्रतिनिधी दादासाहेब नन्नवरे
मराठवाड्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी इस्रायल इथली राष्ट्रीय जलव्यवस्थापन कंपनी मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पासाठी बृहत आराखडा तयार करत असल्याची माहिती इस्रायलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. कोविडमुळे लांबणीवर पडलेला हा प्रकल्प पुनरुज्जीवित करण्यासाठी राज्य शासनानं इस्रायलला सहकार्य करावं, अशी विनंती इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी यावेळी केली.

इस्रायलच्या एशिया पॅसिफिक विभागाचं उपमहासंचालक राफाएल हर्पाज सध्या भारत भेटीवर आले असून त्यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन इथं भेट घेतली, त्यावेळी या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. सूक्ष्म जलव्यवस्थापनासाठी इस्रायल पूर्वीपासूनच प्रसिद्ध आहे.

इस्रायल इथं मोठ्या प्रमाणावर खाऱ्या पाण्याचं निःक्षारीकरण केलं जातं, तसंच वापरलेल्या पाण्यापैकी ८५ टक्के पाण्यावर पुनर्प्रक्रिया केली जाते. त्यामुळे आज आपला देश पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्णच नाही तर जॉर्डनलादेखील पाणी निर्यात करीत असल्याचे राफाएल हर्पाज यांनी राज्यपालांना सांगितलं.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!