सोलापूर शहरातील तापमानात दिवसेंदिवस वाढ
सागर गायकवाड
सोलापूर शहरासह जिल्ह्यात मागील काही दिवसापासून तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. कालचं कमाल तापमान ४१ पूर्णांक ६ दशांश अंश सेल्सिअस होतं.
उन्हाची दाहकता वाढल्यानं आबालवृध्दांना त्याचा त्रास जाणवू लागला आहे. भर उन्हात घराबाहेर पडणार्यां च्या आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता असल्यानं नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन आरोग्य तज्ज्ञांनी केलं आहे. विविध कामासाठी बाहेर पडणार्याानी डोक्यावर टोपी घालून अथवा स्कार्फ बांधून आणि पाण्याची बाटली सोबतच घेऊन बाहेर पडावं. वारंवार घामाच्या धारा शरिरातून निघत असल्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी संतुलित राखण्यासाठी गरजेनुसार पाणी प्यावं असं आवाहन आरोग्य तज्ज्ञांनी केलं आहे.