कितीही पक्ष एकत्र आले तरीही भाजपाचा पराभव करु शकणार नाही- देवेंद्र फडनवीस
निलेश गायकवाड
कितीही पक्ष एकत्र आले तरीही भारतीय जनता पक्षाचा पराभव करु शकणार नाही, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन – एम आय एम ने युती करण्याचा प्रस्ताव ठेवल्याच्या पार्श्वभुमीवर ते आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. या प्रस्तावाबाबत शिवसेनेची काय भूमिका आहे याकडे आमचं लक्ष राहील, असं फडनवीस यांनी सांगितलं.
दरम्यान एमआयएमला मतं फोडणारी भाजपाची बी टीम म्हटलं जातं, ही प्रतिमा खोडण्याचा एमआयएमनं प्रयत्न करायला हवा, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बातमिदारांना सांगितलं.